Home देशविदेश विचार, संघर्ष आणि संहार…

विचार, संघर्ष आणि संहार…

          दरवर्षी हजारो माणसे.मारली जात आहेत,ती का मारली जात आहेत ? त्याची कारणे काय ? याचा शोध घेऊन त्यावर उपाय शोधणे हे प्रत्येकाचे काम आहे.

    माणसे कुठे कुठे मारली जात आहेत,किंवा मारताहेत ? तर देवदर्शनाच्या ठिकाणी चेंगरूण मारताहेत,रस्ते अपघातात मारताहेत,धर्मांध लोक एकमेकांचा जीव घेताहेत,मारामाऱ्या दंगे करून आणि बॉम्ब स्फोट करून,उदा.मुस्लिम आणि हिंदू दहशतवाद्यांचे हल्ले.आर्थिक विषमतेची भांडणे उदा.नक्षलवादी आणि भांडवलदार,जमीनदार,सरकार यांच्यातील संघर्ष.सामाजिक विषमतेमुळे उदा.जातीजातींचे आणि प्रवर्गांची भांडणे,उदा.दलीत सवर्ण संघर्ष आणि ओ बी सी,मराठा संघर्ष,तसेच मातंग बौद्ध यातील abcd वर्गीकरणाचा संघर्ष.

    म्हणजेच आर्थिक विषमतेचे संघर्ष,सामाजिक विषमतेचे संघर्ष आणि धर्मांधतेचे संघर्ष ,याबरोबरच राष्ट्रीय संघर्ष म्हणजे राष्ट्राभिमानामुळे आणि भौगोलिक सीमामुळे दोन देशांचा संघर्ष आणि लढाया,या कारणामुळे दरवर्षी हजारो निष्पाप लोकांचा बळी जातो आहे,आणि मजबुरीमुळे सीमेवर जाऊन तरुण लोक मारताहेत.

    कशामुळे आणि का मारताहेत ? हे आपण पाहिले.याला दोन कारणे आहेत,1.नैसर्गिक आपत्ती मुळे माणसे मारतात . 2 सरकारच्या नाकर्ते पणामुळे किंवा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे.3 तिसरे कारण जे अत्यंत महत्वाचे आणि मुळातील आहे,ते म्हणजे वैचारिक मतभेद आणि त्यामुळे घडणारे संघर्ष.

     नैसर्गिक आपत्तीला कोण जबाबदार ? कुणीच नसले तरी किमान उपाय सरकार करू शकते.उदा.पुरामुळे बरेच जीव जातात ही हानी टाळण्यासाठी पूर नियंत्रण करता येते,जसे की,नद्याजोड प्रकल्प अमलात आणून,नदीवर बोटींची व्यवस्था करून.ढगांची दिशा बदलून.कोरडा दुष्काळावर पण मात करता येते,कृत्रिम पाऊस पाडून.पण सरकारी तिजोरीतील पैसा हा मंत्री आपल्याकडेच वाळवितात म्हणून हे शक्य नसते.उगीच हजारो लाखो करोडोचे घोटाळे होत नाहीत ? हे थांबले तरच नैसर्गिक हानीमुळे होणारे मृत्यू थांबतील अन्यथा नाही.

     महत्वाचा भाग हा की,सामाजिक विषमता म्हणजे जातीयत्ता, अंधश्रध्दा,धर्मांधता आणि आर्थिक विषमता म्हणजे गरीबी,दारिद्र्य,आणि उच्चभ्रू श्रीमंती यातील दरी मिळवणे , उच्चनीचता,अस्पृश्यता नष्ट करणे,जातीची उतरंड नष्ट करणे हे महत्वाचे आहे.हे संघर्षाने किंवा हाणामारीने,बंदुकीने नष्ट होणार नाही तर विचाराची लढाई ही विचारानेच लढावी लागते.विचार बदलावे लागतील,तरच आचरण बदलेल,व्यवस्था बदलेल.व्यवस्था बदलली की आचरण पण बदलते.म्हणून आधी विषमतेचे विचार बदलून समतेचे विचार प्रस्थापित करावे लागतील.विषमतावादी व्यवस्थेत पण विचार बदलता येतात पण ते अमलात आणता येत नाहीत.त्यासाठी समतावादी व्यवस्था प्रस्थापित करावी लागते.म्हणून विचार बदला म्हणजे तुम्ही बदलाल .तुम्ही बदलले की व्यवस्था बदलेल.

        यासाठी विद्यान वादी , मानवतावादी, समतावादी विचाराचे बनण्याची गरज आहे,तरच हे दहशतवादी ,नक्षलवादी , धार्मिक ,जातीवादी , वर्गवादी ,प्रवर्गाच्या लढाया संघर्ष थांबतील.हे थांबले की,मग मानवनिर्मित मनुष्य संहार थांबेल.नाहीतर अजून किती दिवस माणसे मारत राहणार ,? कुठे तरी यास फुलस्टॉप दिलाच पाहिजे.

       लेखक : दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

         दिनांक : 24 मे 2025.फोन : 9420912209