कटकवार विद्यालयात पक्षीसंदेश पतंग बनवा स्पर्धा…

जिल्हा प्रतिनिधि भंडारा 

साकोली:-

       येथील कृष्णमूरारी कटकवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेअंतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब तर्फे नायलॉन मांजा मुळे होत असलेली पक्षी प्राण्यांची होणारी हानी लक्षात घेऊन जाणीवजागृती करण्यासाठी पक्षी संदेश पतंग स्पर्धाचे आयोजन संस्थाअध्यक्ष विद्या कटकवार, संस्थासचिव शिल्पा नशीने यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य विजय देवगिरकर, विज्ञान शिक्षक बी एस लंजे,पुष्पा बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले.

         यावेळी जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा अशोक गायधने यांनी नायलॉन मांजा तसेच चायनिज मांजा यामुळे होणारे दुष्परिणाम समजावून देत पक्षी प्राण्यांना वाचविण्याचा संदेश दिला.

            या पक्षी संदेश पतंग बनवा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे पक्षीआकाराचे व पक्षी वाचवा संदेश असलेले पतंग तयार केले.

          या स्पर्धेत मिडलस्कुल गटात प्रथम क्रमांक कोमल साखरे हिला तर द्वितीय क्रमांक श्रुती बहावे हिला तर तृतीय क्रमांक ईशिका काळसर्पे,जान्हवी धकाते यांना प्राप्त झाला प्रोत्साहनपर क्रमांक अर्पिता देशमुख, प्रिन्सि देशमुख,आलिया टिकेकर, प्राप्ती कनपटे ,अथर्व बहेकार यांना प्राप्त झाला. हायस्कुल गटात प्राची मेश्रामला प्रथम क्रमांक तर गौरी बडवाईकला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला तर तृतीय क्रमांक हर्षिता भेंडारकर ,सिम्पल चोपकर, चिंन्नुर बागडे यांना प्राप्त झाला,कनिष्ठ महाविद्यालयीन गटात डिंपल बावणे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

 स्पर्धेचे परीक्षण पुष्पा बोरकर,अंजना रणदिवे,प्रा.के पी बिसेन यांनी केले. 

          कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता पुष्पा बोरकर,अंजना रणदिवे,निलिमा गेडाम , प्रा जागेश्वर तिडके,प्रा.सौ.एस एन साहू,निसर्गमित्र युवराज बोबडे,ए. एच. मेश्राम, संजय भेंडारकर,शिवदास लांजेवार, संजय पारधी,शिवपाल चन्ने, दिनेश उईके,हरिचंद्र सोनवाने,इतर सर्व शिक्षक, प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले.