बैलगाडा शर्यत जेवढी महत्त्वाची तेवढेच शेतकऱ्यांसाठी मुलांचे शिक्षणही महत्त्वाचे पाहिजे : आमदार दिलीप मोहिते पाटील…. — बैलगाडा शर्यतीत आ.मोहीते यांनी बैलगाडा मालक आणि शौकीनांचे टोचले कान….

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नका शेतकऱ्यांना बैलगाडा शर्यत जेवढी महत्त्वाची तेवढेच शेतकऱ्यांसाठी स्वतःच्या मुलांचे शिक्षणही महत्त्वाचे असले पाहिजे असे खोचक टोला आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी बैलगाडा मालकांना दिला. अलीकडच्या काळात न शिकलेल्या मुलांना मुली देत नाहीत. आणि मुलीसुद्धा अशा मुलांना पसंत करत नाहीत, असे सांगून बैलगाडा शर्यत जेवढी महत्त्वाची तेवढेच मुलांचे शिक्षणही महत्त्वाचे आहे.’’ असे आ.मोहीते यांनी सांगितले.

       खेड तालुक्यातील युवा नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे भावी उमेदवार, माजी सरपंच आशिष येळवंडे आणि मित्र मंडळींनी, शिंदे गावचे ग्रामस्थ यांनी भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. यावेळी बैलगाडा शर्यतीच्या अंतिम दिवशी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

 

बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांचा खानदानी शौक आहे. गाडे पळाले पाहिजेत. मात्र, बैलगाडा शर्यतीमागे धावणाऱ्या मुलांची संख्या पाहता भविष्यात मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता कृपाकरून प्रत्येक बैलगाडा मालकांनी घेतली पाहिजे, ’’असे सांगत आमदार दिलीप मोहिते यांनी बैलगाडा मालक आणि शौकिनांचे एकप्रकारे कान टोचले. 

        खेड-आळंदी चे आमदार मोहिते म्हणाले, ‘‘बैलगाडा शर्यतींना कायदेशीर मान्यता मिळाल्याने गाडामालक आणि शौकीनांमधे उत्साहाचे वातावरण आहे. बहुतांश गाडा मालक शेतकरी वर्गातील आहेत. परिणामी रोजच कुठे ना कुठे शर्यतींचे आयोजन सुरू आहे. या निमित्ताने शेतकऱ्यांची मुले शाळा सोडून बैलगाडा घाटात बहुसंख्येने दिसतात. ही चिंतेची बाब आहे. बैलगाडा शर्यत खानदानी शौक आहे. मात्र, मुले शिकली पाहिजेत. गाडे पळाले पाहिजेत. कित्येक मुले दहावी परीक्षेला बसली नाहीत. आठवी नववीची मुले शाळेत येत नाहीत. रोज बैलगाडामागे ही मुले असतात. कृपा करून आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होवु न देता दक्षता घ्या.