दुर्गा मंदिर सभा मंडपाचे होणार बांधकाम… — आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

मुलचेरा:-तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या दुर्गा मंदिर परिसरात भव्य सभा मंडप बांधकाम होणार असून अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ.धर्मराव बाबा आत्राम यांचतहस्ते नुकतेच सभा मंडप बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

विवेकानंदपूर हे पुनर्वसित बंगाली बांधवांची वस्ती असून याठिकाणी दरवर्षी दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.याठिकाणी भव्यदिव्य दुर्गा मंदिर आहे. मात्र,परिसरात सभा किंव्हा विविध कार्यक्रम घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.पावसाळ्यात तर अधिक त्रास होतो.त्यामुळे येथील नागरिकांनी या परिसरात सभा मंडप मंजूर करण्याची मागणी आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे केली होती.आ धर्मराव बाबा आत्राम यांनी क्षणाचाही विलंब न लावता सभा मंडप मंजूर करून 10 लाखांची निधीही उपलब्ध करून दिली.

विशेष म्हणजे दुर्गा उत्सव शिष्टमंडळाला आ धर्मराव बाबा आत्राम यांनी दिलेला शब्द पाळल्याने स्थानिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.एवढेच नव्हेतर या शिष्टमंडळाने आ.धर्मराव बाबा आत्राम यांना पाचारण करून त्यांच्याच हस्ते भूमिपूजन करून घेतले.काही दिवसातच भव्य सभामंडप उभं राहणार असून यानंतर विविध कार्यक्रम घेताना अडचण भासणार नाही.

सभामंडप भूमिपूजन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम,विवेकानंदपूर चे सरपंच भावना मिस्त्री,नगराध्यक्ष विकास नैताम,जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ममता बिश्वास,पंचायत समितीचे माजी सभापती सुवर्णा येमुलवार,शिवसेना तालुकाध्यक्ष गौरव बाला,जेष्ठ नागरिक शंकर हलदार,सुभाष गणपती,सुंदरनगर ग्रा.प.सदस्य निखिल इज्जतदार, मनोज कर्मकार,अपूर्व मुजुमदार आदी उपस्थित होते.