विषय या मराठी चित्रपटाचे जल्लोषात उदघाट्न…

रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी

२१/०५/२०२३ रविवार रोजी विषय या चित्रपटाच्या मुहूर्ताचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ( इर्वीन चौक) या ठिकाणी बी. एस.एफ.ग्रुप व विषय चित्रपट टीम तर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष म्हणून ऍड. सुधीर एच.तायडे ब्लू टायगर संघटना संस्थापक अध्यक्ष हे होते तर उदघाट्क म्हणून कथा लेखक संदेश भाऊ तायडे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये प्रज्वल बागडे लाईफलाईन गृप अध्यक्ष, अब्दुल रफिक पत्रकार तथा माजी सभापती शिक्षा समिती मनपा, प्रा.जगदीश गोवर्धन ,नीलकंठ सरदार, पत्रकार नकुल नाईक , बी .एस .एफ .ग्रूप अमरावती जिल्हा उपाध्यक्ष सेजल ताटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे हारार्पण व पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय ,जय भीम असे नारे देण्यात आले. ऍक्टर तथा कथा लेखक संदेश भाऊ तायडे यांच्या हस्ते विषय या मराठी चित्रपटाच्या पोस्टर चे उदघाट्न करण्यात आले. ऍड. सुधीर तायडे यांनी चित्रपट हे समाज प्रबोधनाचे प्रमुख माध्यम आहे व असे समाजिक अनेक चित्रपट निर्माण व्हावे असे मार्गर्दर्शन केले.

तसेच या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विषय या चित्रपटातील कलाकारांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चिंतामणी खोब्रागडे, संदेश भाऊ तायडे , प्रा.जगदीश गोवर्धन, ऍड. तातड, विश्वजित सरदार, प्रज्वल बागडे, रिया हजारे, सेजल ताटे, स्वाती सरदार, रोहित सरदार, आदित्य गोले, समीक्षा गोले, रोशन सरदार, नकुल नाइक,प्रकाश अभोरे, अब्दुल रफिक सर,व विषय या चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण सरदार , व्ही. टी. तंत्रपाळे, थोरात सर, अण्णा पुंडकर,आर्यमेघ सरदार ,यश्वर्या हजारे, ओम केवटकर,परी जोशी,इत्यादी अनेक जण उपस्थित होते.