जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा येथे सावित्रींच्या लेकींना साईकलचे वितरण.

धानोरा/भाविक करमनकर 

         जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा ता.धानोरा जि.गडचिरोली येथील 12 विद्यार्थ्यिनींना मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वितरण नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धानोरा केंद्रातील केंद्रप्रमूख .डी.जी.उसेंडी होते.प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत चव्हेलाचे सरपंच एन.बी.मडावी ,जि.प.केंद्र शाळा धानोरा येथील मुख्याध्यापक व्ही.जे.शेडमाके,ग्रामसभा माळंदा चे सचिव क्रिष्णा भूरकूर्या पालक झुंगा उसेंडी,शांताराम दरो,सौ.वारलीबाई पोटावी,रोशनी पदा,नंदा पोटावी व गावातील नागरिक उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यिनींना साईकलींचे वितरण करण्यात आले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक सि.डी.गद्देवार,संचालन एल.डब्ल्यू. धूडसे यांनी केले.यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक ए.एन.बढई ,कु.ए.बी.शेख,संतोष मारकवार,गजानन ठमके,आशिष संतोषवार यांनी सहकार्य केले.