आ.रोहीत पवार व युगेंद्र पवार यांना सुरक्षा पुरवण्यात यावी :-सुप्रिया सुळे यांची मागणी…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार हे प्रचारासाठी अनेक ठिकाणी फिरत आहेत. काही ठिकाणी युवा नेते युगेंद्र पवार यांना घेराव घालण्याच्या घटना घडल्या आहेत व त्याची माहिती माध्यमांद्वारे समाजापुढे आली आहे, ही असविधानिक बाब आहे, लोकशाहीमध्ये सर्वांनाच मत स्वातंत्र्य आहे, मात्र ही घटना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी असून यामुळे रोहित पवार व युगेंद्र पवार यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात त्यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था मिळावी व त्यांच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती काळजी घेण्यात यावी, अशी मागणी या पत्रातून खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

                दोनच दिवसांपूर्वी युगेंद्र पवार यांना काही युवकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. त्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांना घेराव घातल्याच्या बातम्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर त्याचे बारामती तालुक्यातील राजकारणात पडसाद उमटले होते.

               लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये संवेदनशील वातावरण आहे. सुप्रिया सुळे यांनी थेट आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार यांना सुरक्षा व्यवस्था पुरवावी असे ही विनंती पोलीस अधीक्षकांना केल्यानंतर आता याबाबत पोलीस प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.