जल दिनी समर्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची तलावावर भेट…

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधि भंडारा 

          राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी येथे जागतिक जलदिन निमित्ताने ऑक्सिजन पार्क येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

            यावेळी ऑक्सिजन पार्कच्या बाजूला असलेल्या तलावातील पाण्याचे निरीक्षण करण्यात आले. पाण्यावरील वनस्पती मुळे पाणी दूषित झाले आणि त्याचा परिणाम पाण्यातील मासे आणि इतर जीव यांच्यावर होत असल्याचे निदर्शनास आले.

          यावेळी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचे डॉ. पर्वते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व तसेच जल प्रदूषणा बाबत मार्गदर्शन केले.

         या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना भूगोल विभाग इत्यादी विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ.धनंजय गिरेपूजे भूगोल विभागाच्या प्राध्यापक स्वाती नवले गृह अर्थशास्त्र विभागाच्या डॉ. स्मिता गजभिये यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. बंडू चौधरी तर आभार एनसीसी विभागाचे कॅप्टन बाळकृष्ण रामटेके यांनी केले.