गरंडा जिल्हा परिषद शाळेत महात्मा ज्योतिबा फुले – डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन चरित्रावर सामान्य ज्ञान स्पर्धा…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवनी 

      पारशिवनी:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे माझी शाळा – माझा उपक्रम अंतर्गत ओळख थोरांची या उपक्रम अंतर्गत महात्मा ज्योतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त सामान्यज्ञान स्पर्धा घेऊन अभिवादन करण्यात आले.

       याप्रसंगी जिल्हा परिषद माजी विद्यार्थी संघ गरंडा येथील राष्ट्रपाल मेश्राम, राष्ट्रपाल बोंबले, अजय गजभिये, प्रशांत गजभिये, आनंद चव्हाण, आकाश शेंडे,गोलू वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.

       महापुरुषांच्या प्रेरणादायी जीवन चरित्राची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने मुख्याध्यापक खुशाल कापसे यांचे संकल्पनेतून आणि सहाय्यक शिक्षक ओंकार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ओळख थोरांची या उपक्रम अंतर्गत महात्मा ज्योतीराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

        सध्या समाजात महापुरुषांची जयंती ही डीजेच्या नाचगाण्यात साजरी करण्याच्या परंपरेत गरंडा शाळेत मात्र वाचनाने साजरी करण्याचा हा उपक्रम समाजाला दिशादर्शकच म्हणावा लागेल. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद माजी विद्यार्थी संघाद्वारे वही,पेन,पेन्सिल देण्यात आली.