डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

       निलय झोडे

नागपूर विभागीय प्रतिनिधी

        दखल न्यूज भारत

     नंदलाल पाटील कापगते विद्यालय व उच्च विज्ञान महाविद्यालय साकोली येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ.आर.बी.कापगते होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.के.जी.लोथे, प्राध्यापिका एस.एन.गहाणे, एम.एम. कापगते, आर.व्ही.दिघोरे, प्रा. सुनील कापगते, एस. व्ही.कामथे व इतर मान्यवर उपस्थित होते.

       याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ आर बी कापगते यांच्या हस्ते महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.

         मुख्याध्यापिका सौ आर बी कापगते यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या डॉ. आंबेडकर यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही पद्धतीने राज्य चालविण्याकरिता देशाला एक आदर्श व विकसनशील देश म्हणून भारताची ओळख करून देण्यासाठी रात्रंदिवस लिखाण करून एक आदर्शवंत, दिशादर्शक, राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली व त्याद्वारे आज आपला देश एक आदर्श लोकशाही पुरस्कर्ता ठरला आहे. बाबासाहेबांचे विचार आजही सर्व समाजाला दिशादर्शक असून त्यांच्या विचाराने समाजात कार्य केल्यास हीच त्यांना आदरांजली ठरणार आहे असे मौलिक विचार व्यक्त केले. 

        कार्यक्रमाचे संचालन सोनाली क-हाडे यांनी तर आभार प्रदर्शन डी.आर. देशमुख यांनी केले. 

         कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता सर्व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.