तालुका विधी सेवा समिती धानोरा यांच्यातर्फे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम.. — गुड टच बॅड टच याविषयी माहिती- आर.आर.खामतकर न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी.. 

प्रा.भाविक करमनकर 

तालुका प्रतिनिधी धानोरा 

        तालुका विधी सेवा समिती धानोरा यांच्यातर्फे कायदेविषयक जनजागृती अभियान कार्यक्रम श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.

           या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक टिकाराम धाकडे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खामतकर न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी धानोरा,पोलीस निरीक्षक गावंडे,एड.गावडे,एड. दुगा,बाल संरक्षण अधिकारी बुल्ले हे उपस्थित होते.

         प्रास्ताविकेत एड.दुगा यांनी कायदेविषयक माहिती विद्यार्थ्यांना दिली.ऐन तारुण्यात असलेले मुलं मुली नाजूक वळणावर असताना त्यांना बाल लैंगिक अत्याचार विषयी माहिती असणे आवश्यक असते.विध्यार्थ्यांनी मोबाईल व यंत्र युगात अनेक साधने उपलब्ध आहेत.

         त्यामुळे त्याचा योग्य वापर केला पाहिजे तसेच कौटुंबिक हिंसाचार कामाच्या ठिकाणी होणारे शारीरिक हिंसाचार,बालविवाह प्रतिबंधक कायदा या विषयी माहिती दिली.

       बाल लैंगिक अत्याचार पास्को कायद्यात अश्लील व्हिडिओ पाहणे,शेअर करणे तसेच गुड टच बॅड टच क्राईम रिपोर्ट एकात्मिक जीवन जगत असताना जागृत असणे आवश्यक आहे व अश्या कायद्याची तोंड ओळख असली पाहिजे असे मत श्री.आर.आर. खामतकर न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी धानोरा यांनी व्यक्त केले.

       या कार्यक्रमाचे संचालन प्रा. कैलास खोब्रागडे तर आभार प्रदर्शन प्रा.संजय मांडवगडे यांनी केले.यावेळी महाविद्यालयातील प्रा.भाविकदास करमणकर,विराग रणदिवे,प्राध्यापिका निवेदिता वटक मॅडम,वसंत चुधरी,वरिष्ठ लिपिक,प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.