Home Crime विलास नगर खून प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना दोन तासांत अटक… —...

विलास नगर खून प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना दोन तासांत अटक… — विलास नगर खून प्रकरणातील मुख्य आरोपीसह दोन विधीसंघर्षित बालकांना अवघ्या दोन तासांत अटक… — गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई…

अबोदनगो एस.चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

        दखल न्युज भारत

अमरावती :- विलास नगर येथे काल झालेल्या खून प्रकरणात मुख्य आरोपीसह दोन विधीसंघर्षित बालकांना अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दोन तासांत ताब्यात घेण्यात यश मिळवले. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यात यश पाटणकर (रा. विलास नगर) याचा मृत्यु झाला होता.

संविधान चौकात उघड्या रस्त्यावर प्राणघातक हल्ला…

       १९ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान चौक, विलास नगर येथे चार जणांनी यश पाटणकर याच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. छातीवर आणि पाठीवर झालेल्या वारांमुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात कलम 103(1), कलम 61(2), कलम 3(5) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेची जलदगती मोहीम…

         घटनेनंतर पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी सर्व पथकांना आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. समांतर तपास सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी प्रिन्स भागचंद श्रीवास (१८) रा. विलास नगर, गल्ली क्र. २, अमरावती तसेच त्याचे दोन अल्पवयीन साथीदार विलास नगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

        तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि वाहन जप्त करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी सर्व आरोपींना गाडगेनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

यशस्वी कारवाईत अनेक अधिकाऱ्यांचा समावेश…

         ही कामगिरी पोलीस आयुक्त अरविंद चावरीया, उपायुक्त गणेश शिंदे, रमेश धुमाळ, शाम घूगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

        कारवाईत पोनि संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकातील अधिकारी व कर्मचारी सपोनि अमोल कडू, महेश इंगोले, मनिष वाकोडे, अनिकेत कासार (सायबर), प्रियंका कोटावार (सायबर),अंमलदार सुनील लासूरकर, दिपक सुंदरकर, संभाजी केंद्रे, गजानन ढेवले, फिरोज खान, सतीश देशमुख, मंगेश लोखंडे, आस्तीक देशमुख, मनोज ठोसर, मंगेश परिमल, सचिन बहाळे, संग्राम भोजने, प्रशांत मोहोड, सैयद नाझीम, सचिन भोयर, विशाल वाकपांजर, राहुल ढंगेकर, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले, रंजीत गावंडे, अमोल मनोहरे, नरेश मोहरील, संदीप खंडारे, राहुल दुधे, चेतन शर्मा, प्रभात पोकळे, निखील माहूरे यांनी सहभाग घेतला.