Home Crime अवैधरित्या झोपडीत दारु विक्री करणाऱ्या दोघांना अटक… — एकूण रु.१,१५,२०० /-...

अवैधरित्या झोपडीत दारु विक्री करणाऱ्या दोघांना अटक… — एकूण रु.१,१५,२०० /- माल जप्त…

ऋषी सहारे 

   संपादक 

आरमोरी :- अवैधरित्या दारुची वाहतूक करुन झोपडीत विक्री करणाऱ्याच्या झोपडीवर लपून पाळत ठेवली असता विक्री करताना छापा मारुन अशोक ठाकरे व शिवम भानारकर या दोघांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेत त्यांचे कडून अवैध दारु वाहतूकीत वापर करण्यात आलेली स्कूटी व दारुसह असा एकूण १,१५,२००/- एक लाख पंधरा हजार दोनशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

         आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा मौशीखांब टोली येथील घटना दि.२६ अप्रिल ला गोपनीय माहिती मिळालेल्या नुसार आरोपी अशोक ठाकरे वय २६ वर्षे रा.मौशीखांब टोली ता.जि.गडचिरोली याच्या झोपडी जवळ लपून पाळत ठेवली असतांना यातील दुसरा आरोपी शिवम भानारकर वय २० वर्षे रा.गांधीनगर ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर याने आपल्या स्कूटीने दारुची वाहतूक करुन अशोक ठाकरे याचे झोपडी मध्ये विक्री करणाऱ्या करीता ठेवली असतांना धाड टाकली.

           यात खालील किंमतीचा व वर्णनाचा मुद्देमाल अवैधरित्या मिळून आला. झोपडी मध्ये खुले १८०एम.एल.मापाच्या काचाचे राॅयल स्टाॅग कंपनी व्हिस्की चे ४८ निपा तसेच एका सिलबंद खरड्याचा बाॅक्समध्ये ४८ निपा अशा ९६ निपा प्रती किंमत ३५०/-रुपये प्रमाणे ३३,६००/- तीन सिलबंद खरड्याचे बाॅक्समध्ये ५०० एम एल मापाचे हायवर्ड ५०००प्रिमियर स्टाॅग बियर असे लिहून असलेले प्रती बाॅक्समध्ये २४ नग टिनाचे डब्बे एकूण ७२ नग प्रती नग डब्बा ३००/- प्रमाणे एकूण २१,६००/-आणि अवैधरित्या दारु वाहतूकीसाठी वापरलेली जुपीटर १२५ स्कूटी क्र. एम .एच. ३४ सि. एफ.सी.एफ.८१०६ की.व्ही.एस.६०००/- रुपये किंमतीची असा एकूण एक लाख पंधरा हजार दोनशे रुपये किंमतीची माद जप्त करून पंचा समोर पंचनामा करून दोघांना ताब्यात घेऊन कलम ६५( ई ) ( अ ) ९८ ( २ ) ,८३ म.दा.का. अटक करण्यात आली. अधिक तपास पोउपनी नरेश सहारे करीत आहेत.