राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
देसाईगंज :- धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या प्रकरणामुळे महाराष्ट्रासह देशभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटलेआहे.
आंदोलना दरम्यान संबंधित बाबा विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात आमदार रामदासजी मसराम उपस्थित राहून त्यांनी या प्रकरणावर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही आणि अशा प्रकारांमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.तसेच नागपुर च्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्रि नितीन गडकरी व आर.एस.एस.चे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन भागवत यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
त्या प्रसंगी उपस्थित माजी सभापती परसराम टिकले, हिराभाई मोटवानी,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जिवन पाटील नाट, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष देसाईगंज राजेंद्र बुल्ले, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, माजी उपसभापती नितीन राऊत,जयंत हरडे, आरती लहरी,नगरसेवक तथा गटनेता विकास प्रधान,धनपाल मिसार सर, माजी सभापती गिरीधर तितराम, मनोहर निमजे, विलास बनसोड, कमलेश बारस्कर, युवक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष देसाईगंज अमर भर्रे,नगरसेवक शाम उइके नगरसेविका मंदा समर्थ, नगरसेविका गुरमीतकौर चावला,नगरसेविका आशाताई दहिवले, प्रकाश समर्थ,अरुण कुंभरवार, दुर्वास नाईक, हिरामण कुळमिथे,टीकाराम नीमकर, प्रमोद पत्रे, नंदू चावला,वैष्णवी आकरे, श्रीराम मोहूर्ले, हिरालाल बुराडे, हरिदास बगमारे, वैभव मेश्राम, शैलेश दुपारे,हिरालाल दोनाडकर, श्रावण राऊत, पुंडलिक पर्वते, प्रशांत अंकमवार, दिनेश मोहूर्ले, प्रमोद मेश्राम, पितांबर देशकर, गोपाल बोरकर, वैभव कुर्जेकर, सचिन राऊत,तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.



