राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
येथील सरकारमान्य अमोल टायपिंग इन्स्टिट्यूटच्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या नव्या कार्यालयाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य पुंडलिक आकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, पंचायत समितीचे माजी उपसभापती, अमोल टायपिंग इन्स्टिट्यूट संचालक नवनाथ धाबेकर, माजी पं स सदस्य गीताताई धाबेकर, इंजिनियर हर्षल धाबेकर, देविदास बनसोड, विठ्ठल मांडवे तांदूरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ह.भ.प. मिश्रा महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली.
अमोल टायपिंग इन्स्टिट्यूट हे केंद्र सन १९८६ पासून कुरखेडा येथे कार्यरत असून, गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना टायपिंगचे प्रशिक्षण व मार्गदर्शन देत आहे. या संस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअर घडले असून, परिसरातील युवक-युवतींसाठी ही संस्था एक विश्वासार्ह प्रशिक्षण केंद्र ठरली आहे.
कार्यक्रमाचे संचालन नवनाथ धाबेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन हर्षल धाबेकर यांनी मानले.



