Home Social कढोली येथे” प्रयास” वाचनालयाचे भव्य उद्घाटन,माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते यशस्वी...

कढोली येथे” प्रयास” वाचनालयाचे भव्य उद्घाटन,माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार…

    राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

       मौजा कढोली येथे “प्रयास” वाचनालयाचे भव्य उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी गजबे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रेरणा दिली. उद्घाटनप्रसंगी दिलेल्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थित सर्वांना उत्साहित केले.

         “प्रयास “वाचनालय हे कढोली गाव आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा खजिना आहे. येथील मेहनतीमुळे तुषार धाडसे, करण कोहपरे हे एस.आर.पी. एफ., तर ओमकार ठाकरे, शंतनू मडकाम, जास्वंदा कोकोडे आणि करिष्मा कोहाडे हे महाराष्ट्र पोलीस सेवेत यशस्वी झाले. हे यश तुमचे आहे, पण प्रयास वाचनालयासारख्या केंद्रांमुळे असे यश आणखी वाढेल. वाचन हे यशाचे बीज आहे, प्रत्येकाने प्रयास सुरू ठेवावा.असे मत माजी आमदार कृष्णा गजबे यांनी व्यक्त केले.

        उद्घाटनप्रसंगी यावर्षी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तुषार धाडसे (एस.आर.पी. एफ.), करण कोहपरे (एस.आर.पी. एफ.,), ओमकार ठाकरे (महाराष्ट्र पोलीस), शंतनू मडकाम (महाराष्ट्र पोलीस), जास्वंदा कोकोडे (महाराष्ट्र पोलीस) आणि करिष्मा कोहाडे (महाराष्ट्र पोलीस) यांचा माजी आमदार गजबे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी स्पर्धात्मक पुस्तके मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली. या विद्यार्थ्यांच्या यशाने गावाला अभिमान वाटत आहे.

       प्रसंगी तालुका अध्यक्ष चांगदेवजी फाये, पीएसआय भुंबेजी , नवराष्ट्र प्रतिनिधी सेवाकर सहारे,उपसरपंच किरणजी आकरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चौके, मडावीजी आणि कढोलीचे त.मु.स. गंगाधर लोणबले उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रयास वाचनालयाला शुभेच्छा दिल्या.

        हे वाचनालय स्थानिक तरुणांना पोलिस भरती, सरकारी नोकऱ्या आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारीचा मार्ग मोकळा करेल, अशी अशी अपेक्षा आहे.