रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
वैशाखी बुद्ध पौर्णिमा निमित्त चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे आयोजित कार्यक्रमात चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
यावेळी त्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.तसेच भगवान गौतम बुद्धांचे विधिवत पूजन-अर्चन केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.उपस्थित नागरिकांशी आत्मीयतेने संवाद साधत आमदार महोदयांनी भगवान बुद्धांच्या करुणा,समता व बंधुत्वाच्या शाश्वत संदेशाचे स्मरण करून सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास चिमूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष संजय नवघडे,भिसी-नेरी-शंकरपूर मंडळ अध्यक्ष मनिष तुम्पल्लीवर,महाराष्ट्र राज्य बाजार समिती सह.संघ मर्यादित पुणे संचालक घनश्याम डुकरे,शंकरपूर सरपंच साईश वारजुकर,प्रशांत चिडे,रोशन ढोक,बंटी वनकर,प्रकाश असावा,भाजप शक्ती प्रमुख सावण गाडगे,गोलू मालोदे,गोलू भरटकर,नरेंद्र हजारे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.



