शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या प्र.क्रं १० काग व बाम्हणी येथील नागरिकांच्या विविध समस्यांची पूर्तता करून प्रभागातील नागरिकांना दिलासा देणे संबंधाने रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे चिमूर तालुका अध्यक्ष आशिद अमरदिप मेश्राम यांनी मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांना नुकतेच निवेदन दिले आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की,चिमूर अंतर्गत येणाऱ्या प्र.क्रं १० काग-बाम्हणी येथील विविध समस्या संदर्भात मागील वर्षी १९/०२/२०२४ ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी प्र.क्रं १० मौजा काग येथे ‘गनिमी कावा’ आंदोलन केले होते.
या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली होती व प्रभागातील काही समस्या तात्काळ मार्गी लागल्या होत्या,तर काही समस्या या एक-दोन महिन्यात मार्गी लावल्या होत्या आणि काही समस्या अद्यापही प्रलंबित आहेत.
दोन्ही गावच्या समस्या बाबत मुख्याधिकारी चिमूर यांनी खालील दिलेल्या प्र. क्रं १० काग- बाम्हणी येथील नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविण्याकरिता कार्यवाही करावी याबाबत नंम्रपणे विनंती केली आहे.
मागण्या...
१. प्र.क्रं १० काग-बाम्हणी या दोन्ही प्रभागातील नाल्यांचा गाळ उपसून काढणे व किटकनाशकांची फवारणी करणे.
२. स्मशानभूमीचे शेड व स्मशानभूमीकडे ये-जा करणारा रस्ता उपलब्ध करून देणे.
३. प्र.क्रं १० काम बाम्हणी या दोन्ही प्रभागाची विद्युत वीज पुरवठा कनेक्शन हे चिमुर वरुन जोडण्यात यावे.
४. प्र.क्रं १० काग येथील श्री.अजाबराव नैताम सुरेश पस्चाके यांच्या घरासमोरील पुलियाचे नवीन बांधकाम करण्यात यावे.
५. प्र.क्रं १० काग बाम्हणी येथील नागरिकांना नवीन नळ कनेक्शन उपलब्ध करून द्यावे.
६. प्र.क्रं १० काग येथील प्लॉट क्रं १ यामध्ये पाणी पिण्याच्या नवीन टाकीचे बांधकाम करण्यात यावे.तसेच नागरिकांना ये-जा करण्यास रस्त्याचे व नालीचे बांधकाम करण्यात यावे.
७. प्र.क्रं १० काग येथील श्री.शामराव भोपे,राजकुमार मेश्राम बालाजी राणे मधुकर धोंगडे यांच्या घरासमोरील नवीन नालीचे बांधकाम करण्यात यावे.
८. प्र.क्रं १० काग येथील शासकीय कामासाठी राखून ठेवण्यात आलेल्या प्लॉट क्रं १ मध्ये काग येथील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी वाचनालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात यावे.
९. प्र.क्रं १० काग येथील श्री.शामराव भोपे,राजेंद्र मेश्राम,कचरू रामटेके,राहुल गजभिये,बालाजी राणे यांच्या घरासमोरील नवीन नालीचे बांधकाम करण्यात यावे.
१०. प्र.क्रं १० बौद्ध विहाराच्या परिसरातील नागरिकांना नळ कनेक्शन उपलब्ध करून देणे,तसेच जि.प.प्राथ.शाळा येथे नवीन नळ कनेक्शन उपलब्ध करून देण्यात यावे.
१९. प्र.क्रं १० काम ते नंदारा पाणंद रस्ता हा नगर परिषद, चिमूर च्या हद्दीत येत असून या पाणंद रस्त्याची एकंदरीत मोजणी करून द्यावी.



