फ्लाईंगसिख कॅप्टन मिल्खा सिंग यांच्या जयंतीदिनी युवारंग तर्फे आरमोरीत भाग मिल्खा भाग महामॅरेथॉन… युवारंग महापुरुष, क्रांतीकारी व आदर्श खेळाडूंचे विचार युवकांमध्ये रुजविणारे संघटन :- अशोकजी ठकराणी

प्रितम जनबंधु

    संपादक 

       आरमोरी :- भारतीय सैनेचे महान आंतरराष्ट्रीय धावपटू फ्लाईंगसिख, पद्मश्री कॅप्टन मिल्खा सिंगजी यांच्या जयंतीनिमित्त युवारंग लोकहीत संघटना, आरमोरी तर्फे आज दिनांक २० नोव्हेंबर २०२३ ला सकाळी ७:०० वाजता श्री. छत्रपती चौक टी पॉईंट येथे भाग मिल्खा भाग मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

           या कार्यक्रमाला उदघाटक म्हणुन अशोकजी ठाकराणी उद्योजक आरमोरी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. निळकंठ मसराम साहेब वैद्यकीय अधिकारी, गडचिरोली तर प्रमुख अतिथी म्हणून पंधरे सर मुख्याध्यापक महात्मा गांधी कन्या विद्यालय आरमोरी, विलासजी गोंदोळे मुख्यसंपादक दीपस्तंभ विधायक न्यूज, चंदाताई राऊत सामाजिक कार्यकर्त्या आरमोरी, विभाताई बोबाटे सामाजिक कार्यकर्त्या आरमोरी, धनराजजी कांबळे योग प्रशिक्षक आरमोरी, अनिलजी तोरणकर साहेब आरमोरी, छायाबाई जुआरे ज्येष्ठ महिला नागरिक आरमोरी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. 

             सदर स्पर्धा महिला व पुरुष अश्या दोन खुल्या गटात आयोजित केलेली होती ज्यामध्ये शेकडो युवक व युवतींनी सहभाग घेतला होता. पुरुष गटात ६ किमी. दौड मध्ये प्रथम क्रमांक नागेश्वर संजय रसे चंद्रपूर याने तर द्वितीय क्रमांक दुर्योधन शेंडे चंद्रपूर याने पटकाविला तर तृतीय क्रमांक प्रकाश रमेश मिरी कुरखेडा या खेळाडूने पटकाविला. क्रमांक ४ ते १० पर्यंत येणाऱ्या विजेत्यांना प्रोत्सानपर बक्षीस वितरण करण्यात आले.

         ज्यामध्ये उज्वल चांदेकर, कार्तिकदास काटेखाये, विशाल रामटेके, सौरभ कन्नाके, रोशन बोदलकर, शिवाजी गोस्वामी, जय नंदनवार यांनी आपले स्थान कायम राखले तर महिलांच्या ३ किमी दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक आचल रमेश कडुकर चंद्रपूर तर द्वितीय क्रमांक तेजस्विनी कामडे चंद्रपूर तर तृतीय क्रमांक वैष्णवी प्रभाकर नैताम चंद्रपूर यांनी पटकविले. क्रमांक ४ ते १० पर्यंत येणाऱ्या विजेत्यांना प्रोत्सानपर बक्षीस वितरण करण्यात आले.

          ज्यामध्ये दीक्षा देवाजी तिजारे, वैशाली विलास मालेकर, कल्याणी राजेंद्र भरे, रोहीनी अनिल जुआरे, गायत्री नंदकिशोर कन्नाके, पूजा तुळशीदास अजवाले, उज्वला पांडुरंग सेलोकर या स्पर्धकांनी क्रमांक पटकाविला.

             तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये ८० वर्ष वयाचे प्रभाकरजी रामपूरकर, घनश्यामजी धकाते, संजय सातपुते तर महिलांच्या खुल्या गटात १२ वर्षाच्या समिधा संजय मने या चिमुकली ने ३ किमी. अंतर पार करत सर्वांची मने जिंकली सर्व विजेत्या स्पर्धकांना मेडल्स, प्रमाणपत्र, रोख व वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले.

          सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारुदत्त राऊत यांनी तर प्रास्ताविक राहुल जुआरे यांनी व आभार आशुतोष गिरडकर यांनी मानले.

         या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवारंगचे सदस्य मनोज गेडाम, रोहित बावनकर, लीलाधर मेश्राम, पंकज इंदूरकर, अंकित बन्सोड, प्रथमेश सारवे, सूरज नारनवरे, यादव दहिकार, अमोल दहिकार, सुरेश मेश्राम, संजय वाकडे, देवेंद्र कुथे, सौरभ जांभूळे, आशिष रामटेके, निखिल शेरकुरे, शाम सावसाकडे, महेंद्र मने, विशाल चौके, अनिकेत हजारे, गौरव वासेकर, प्रेम चौके, नैतिक वासेकर, भुषण हजारे, उमेश पिंपळकर, दीपक ठाकरे, राजुजी अतकरे, राजुजी घाटूरकर, ज्योतीताई बघमारे, आशाताई बोळणे, उमाताई कोडापे, महानंदा शेंडे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.