छठ पुजान्वये उपवास पकडणाऱ्या महिलांनी मावळत्या आणि उगवत्या सुर्याला अर्घ्य देऊन,”छठ पूजा महोत्सव, कन्हान नदीत केला साजरा…

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी – पारशिवनी तालुक्यातील कन्हान नदी काठावर छठ पुजा उपवास करणाऱ्या महिलांनी,भाविकांनी,नागरिकांनी विधिवत पूजा अर्चना करुन मावळत्या आणि आज सकाळी उगवत्या सुर्याला अर्घ्य देऊन कौटुंबिक व विश्व शांतीसाठी प्राथना केली व व्रत आणि छट पूजा महोत्सव उत्साहात तथा थाटात साजरा केला.

     कन्हान नदी येथे छठ पूजा महोत्सव हा उत्तर भारतीयांचा सर्वात मोठा सण असुन,”चार दिवसीय छट पुजा महोत्सवचा आज सकाळी समारोप झाला.

 

          पहिल्या दिवशी महिलांनी,भाविकांनी नदीत स्नान करून छठ पूजेला सुरुवात केली.दुसऱ्या दिवसाला खरना व या दिवशी महिला,भाविकांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 36 तास उपवास करुन सायंकाळी सूर्यास्तानंतर उपवास सोडला आणि त्यानंतर अन्न तयार करून सूर्याला अर्पण केले.तिसर्‍या दिवशीला सायंकाळी महिला व भाविकांनी बांबूच्या टोपल्यांत फळे,तांदूळ पुजाचे साहित्य आदि सह कन्हान नदीकाठावर सूर्याला अर्घ्य अर्पण केले.

        त्यानंतर परिवारा सोबत मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून विधिवत पूजा अर्चना करण्यात आली.आज सकाळी पहाटेला सोमवार (दि.२०) नोव्हेंबरला महिला,भाविकांनी व नागरिकांनी विधिवत पुजा अर्चना केली व कान्हन नदी पात्रात उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन कौटुंबिक व विश्व शांतीसाठी प्रार्थना करुन ३६ तास चाललेल्या व्रत आणि छठ पूजा महोत्सवाची थाटात सांगता केली.

     यावेळी विविध सामाजिक संघटन पदाधिकाऱ्यांनी,पक्ष पदाधिकाऱ्यांनी आणि इतर दानदात्यांनी फळ,अल्पोहार,शरबत,खाद्य पदार्थाचे वितरण केले.

       छठ पूजा महोत्सव निमित्य कन्हान – पिपरी नगर परिषद आणि कांद्री नगर पंचायत प्रशासन द्वारे साफ सफाई,विद्युत व्यवस्था,पार्किंग सह इतर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलल्या होत्या. 

        छठ पूजा महोत्सव दरम्यान नदी काठावर कुठलीही अनुचित घटना घडु नये आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी कन्हान पोलीसांचा चोख बंदोबस्त होता .