Home देशविदेश मनुवादी शक्ती व संविधान,बहुजन समाजातील नागरिक वेळीच सतर्क झाले पाहिजे…. —...

मनुवादी शक्ती व संविधान,बहुजन समाजातील नागरिक वेळीच सतर्क झाले पाहिजे…. — बहुजन समाजाला गुलाम बनविण्यासाठी हिंदू राष्ट्राच्या आड क्रुर ब्राम्हणवाद पोसला जात आहे.

       भारतीय संविधानाचे खरे दुश्मन आता उघडपणे संविधानाच्या विरोधामध्ये कार्य करायला लागले आहेत.

    संभाजी ब्रिगेडचे प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरील झालेला हल्ला हा संविधानावर झालेला हल्ला आहे.

      ज्या पद्धतीने मनुवादी शक्तीने हेमंत करकरे,कलबुर्गी,पानसरे,नरेंद्र दाभोळकर,यांच्या सुनियोजन पद्धतीने हत्या केलेल्या आहेत हे विसरून चालणार नाही.

       प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झालेला आहे तो हल्ला दीपक काटे या व्यक्तीने केला आहे.तो व्यक्ती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अतिशय निकटचा,जवळचा कार्यकर्ता साथीदार,आहे.  

        महाराष्ट्र सरकार मधील सर्व मंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या रूपामध्ये गुंडांच्या टोळ्या तयार केलेल्या आहेत,आता या टोळ्या थेट विधान भवन व विधान परिसरामध्ये येऊन खुलेआम पणे विरोधी पक्षाच्या नेत्यांना मारण्याची धमकी देऊन जात आहेत हे कसले लक्षण आहे?हे संपूर्ण कृत्य संविधान संपविले जात असल्याचे लक्षण आहे.

      आर.एस.एस.विदेशी वैदिक क्रूर ब्राह्मणवादी शक्तीने संविधान व देशावरती ताबा मिळविलेला आहे.हे सत्य आता लपून राहिलेलं नाही.

       इथून पुढच्या काळामध्ये 

 जे संघटन संविधानाच्या समर्थनार्थ कार्य करतील त्या सर्वांना,जेलमध्ये टाकण्याचे प्रयोजन यांनी करून ठेवलेले आहे.

      जन सुरक्षा कायदा हा त्यासाठीच बनविलेला आहे.हा जन सुरक्षा कायदा नाही,तर,”तो जन सुरक्षा हत्या! असा तो कायदा आहे. 

       महाराष्ट्र भारतातील सर्वात प्रगत राज्य,भारत सरकारला सर्वात जास्त रेवेन्यू इन्कम महाराष्ट्राकडून होते किंवा महाराष्ट्रावरच देश चालतो असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

        यांना जन सुरक्षा कायद्याचा गैरवापर करून महाराष्ट्राची संपूर्ण नैसर्गिक संपत्ती,खनिज,कोळसा,लिथियम, गॅस,जंगल,जमीन,जल पाणी ह्या संपूर्ण मालमत्ता अडाणी, अंबानी,ह्यांना विकायच्या आहेत.थोडक्यात त्यांनी संपूर्ण भारताचे खाजगीकरण करायला सुरुवात केलेली आहे.

      संपूर्ण देश हा उद्योगपतींच्या घशामध्ये घालायचा आहे,त्यासाठीच हा कायदा आणलेला आहे,त्या कायद्यामध्ये अर्बन नक्षलवाद,शहरी दहशतवाद,आतंकवादी,असा कुठेही नाम उल्लेख केलेला आढळत नाही.मुळात हा कायदाच संविधान विरोधी आहे.या कायद्यामुळे तुम्ही सरकारच्या कोणत्याही योजनेला विरोध करू शकणार नाही.

      असे अनेक नवीन नवीन कायदे पास करून ते संविधान संपवण्याच्या तयारीला लागलेले आहेत.ही गोष्ट सामान्य जणांच्या लक्षात येत नाही.

       मोहन भागवत यांनी स्वतः कबूल केले आहे की भारत हा लवकरच म्हणजे पंधरा वर्षांमध्ये अखंड हिंदू राष्ट्र बनेल असे वक्तव्य केलेले आहे .

      हिंदुराष्ट्र म्हणजेच संविधानाचा विनाश…

     ते हिंदू राष्ट्र नसेल,हिंदू राष्ट्राच्या नावाखाली विदेशी वैदिक,मनुवादी,क्रूर ब्राह्मणवादी राष्ट्र निर्माण करण्याचं कार्य हाती घेतलेले आहे.

      हिंदू धर्म आता हिंदूंचा राहिलेला नाही,तो आता फक्त विदेशी ब्राह्मणांचा आस्थेचा धंदा झालेला आहे.

       जोपर्यंत हिंदू समाज ब्राह्मणवादी शक्तीच्या विरोधामध्ये जाऊन आंदोलन करणार नाही तोपर्यंत संपूर्ण बहुजन समाजाला ब्राह्मणवादी धर्माची गुलामी करावी लागेल.

        आज भारतामध्ये ब्राह्मणवादी व्यवस्था खूप शक्तिशाली झालेली आहे.तिच्याशी लढणे आता सोपे राहिलेलं नाही.हे आता बहुजनांनी ओळखायला पाहिजे.

      ब्राह्मणवादी शक्तीचा बिमोड करण्यासाठी दुसरा स्वातंत्र्यलढा उभा करावा लागेल इतक्या क्रूर रूपामध्ये ती आपल्यासमोर दाखल झालेली आहे.

       ब्राह्मण्यवादाचा नायनाट हाच बहुजन मुक्तीचा मार्ग आहे.हिंदु राष्ट्राच्या नावाखाली भारतातील संपूर्ण बहुजन समाजाला चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये पुन्हा गुलाम ठेवण्याचं काम त्यांनी सुरू केलेले आहे.

      त्यासाठी त्यांनी आतंकवादी संघटन आर एस एस,बजरंग दल,श्रीराम सेना,विश्व हिंदू परिषद,हिंदू महासभा,परशुराम सेना,वैदिक सनातन संस्था, हिंदू युवा संघटन,राष्ट्रसेविका महिला,ह्या सर्व संघटना आणि अशा अनेक संघटनांनी भारतातील बहुजनांना हिंदू धर्माच्या नावाखाली गुलाम करण्याचं कार्य सुरू केलेले आहे.

        त्यामुळे भारतातील जागरूक नागरिकांनी या संघटनेमध्ये कार्य करू नये,संविधान वाचवण्याचा हा एकच मार्ग भारतासमोर सध्या आहे.

        हिंदू राष्ट्राच्या बुरख्याआड क्रूर ब्राह्मणवाद पोसला जात आहे.भारतातील बहुजनांनी लवकरच याबाबतीत जागरूक होऊन आंदोलन करायला रस्त्यावर आले पाहिजे.अन्यथा या शक्ती बहुजन समाजाला हजारो वर्ष गुलामी मध्ये ठेवतील ही काळ्या दगडावरची रेष आहे.

        कावड यात्रेमध्ये ब्राह्मणवादी शक्तीने,आरएसएस भाजपाने कावड यात्रेच्या नावाखाली संपूर्ण भारतामध्ये दहशत माजवण्याचा विडा उचललेला आहे.

       कावड यात्रा ब्राह्मणवादी शक्तीची ढाल बनून समोर येत आहे हे या देशाचे दुर्दैव.कावड यात्रेच्या माध्यमातून हिंदू मुस्लिमांमध्ये भांडणे लावून देशाला अराजकतेकडे घेऊन जायचे आहे.

      देशात एकदा अराजकता माजली,त्यानंतर यांना राज्य करणे सोपे जाईल.त्यामुळे आरएसएस-बीजेपी मनुवादी ब्राह्मणवादी संघटनांना,देशात अराजकता वाजवायची आहे.

      त्यामुळेच ते विविध धर्मांमध्ये,विविध जातीमध्ये,विविध पंथामध्ये,कटुता कशी निर्माण होईल,भारताच्या एकतेला अखंडतेला सुरुंग कसा लावता येईल ह्या साठी या मनुवादी शक्ती कार्यरत झालेल्या आहेत.

     ह्यांना हिंदू राष्ट्र निर्माण करायचे नाही.हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मण्यवादी ब्राह्मणी धर्म असलेले क्रूर ब्राह्मण राष्ट्र निर्माण करायचे आहे.

      !जय संविधान जय भारत!

            मानवता सत्य धर्म  

               98 22 65 96 88  

              दीपक जाधव