महायुतीच्या सर्वच जागांवर विजय मिळविण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार :- उद्योगमंत्री उदय सामंत… 

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

       पुणे : कल्याण-डोंबविली लोकसभा मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, याबाबतचे पत्र भाजपकडून देण्यात आले आहे. असे पत्र आले असले, तरी शिंदे हे धनुष्यबाण हे चिन्ह घेऊनच निवडणुकीला सामोरे जातील. त्या ठिकाणीही भाजपचे कार्यकर्ते हे धनुष्यबाणाला मत देतील, असा विश्वास सांमत यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील सर्वच जागांवर विजय मिळविण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने उतरली आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते.

            तसेच, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याबद्दलच्या प्रश्नावर अजित पवार यांनी शिवतारे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांचा शिवतारे यांना राग असणे साहजिकच आहे. मात्र, निवडणुकीला सामोरे जाताना काही बाबी बाजूला ठेवून मित्रपक्ष म्हणून भूमिका बजावायला लागते. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील शिवतारे यांच्यासोबत बोलले आहेत, ते योग्य निर्णय घेतील, असेही सामंत यांनी सांगितले.

            पुण्यातील शिवसेना (शिंदे गट) कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय माशिलकर, शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, अजय भोसले आदी उपस्थित होते. पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. सामंत म्हणाले, बारामतीबाबत विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिवतारे यांचा अपमान झाला किंवा नाही याबाबत भाष्य करणे उचित नाही. अजून निवडणुकीसाठीचा फॉर्म भरण्यासाठी बराच अवधी शिल्लक आहे.