मुंबईचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश..

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

 

मुंबई : मुंबईतील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ३ चे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

           यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांच्यासह त्यांचे सुपुत्र हृषीकेश ब्रीद,विधानसभा समन्वयक दत्ताराम काडगे,ग्राहक कक्ष वॉर्ड संघटक दत्ताराम चिंदरकर,उपशाखाप्रमुख संतोष यादव,सुधाकर सावंत,सचिन येडेकर,अनिल बनकर यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

          यावेळी शिवसेनेचे सचिव संजय मोरे,शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर,माजी नगरसेवक राम रेपाळे,गोरेगाव विभागाचे विभागप्रमुख स्वप्नील टेम्बवलकर,शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे,तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.