जे एस पी एम महाविद्यालयाचे आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत सुयश.

    भाविक करमनकर  

धानोरा तालुका प्रतिनिधी 

     धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथील विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 12 10 2023 ते 13 10 2023 दरम्यान ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महाविद्यालयातील थॉमस तिरकी सपन किंडो प्रफुल तिग्गा गौरव गवर्ना कुंदन समरथ यांना या स्पर्धेत तृतीय स्थान प्राप्त झाले.

         त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती शालिनीताई रमेशचंद्र मुनघाटे कार्याध्यक्ष सौ आशीताई रोहनकर सचिव सौ मीनालताई सहानी सहसचिव सौरभ मुनघाटे तथा संस्थेचे सर्व पदाधिकारी शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा डॉ संजय मुरकुटे प्राचार्य डॉ पंकज चव्हाण सर्व प्राध्यापक वृंद तसेच प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले.