जे एस पी एम महाविद्यालयातील भूगोल विभागामार्फत भूगोल समूह क्षेत्रीय सर्वेक्षण लाडज येथे संपन्न…

    भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी 

       श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथील गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव पदव्युत्तर भूगोल एम ए विभागाचे समूह प्रकल्प भौगोलिक सर्वेक्षण मौजा लाडज तालुका ब्रह्मपुरी येथे घेण्यात आले.

         लाडज हे गाव वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे वैनगंगा नदी पात्रातील बेट आहे. खऱ्या अर्थाने ह्या भूमीची निर्मिती व तेथील भौगोलिक परिस्थितीचा तेथील प्रगत कृषी यावर कसा प्रभाव पडतो याबद्दल एम ए भूगोलच्या तृतीय सत्रातील व कृषी रचनेचा व भूरूपशास्त्रीय प्रक्रियेचा मानवी क्रियाकलाप यावर कसा प्रभाव आहे हे जाणून घेण्याकरिता एमए भूगोल चे गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार क्षेत्रीय सर्वेक्षण करण्यात आले सदर उपक्रमात लाडच भूमी खंड याची निर्मिती व तेथील भूरूपात होणारे बदल व ग्रामस्थ पुढील आव्हाने याबद्दल तसेच ब्रह्मपुरी वडसा या शहरांना प्राथमिक सेवा देणारे सेवा केंद्र म्हणून ह्या गावाचे फार मोठे योगदान म्हणजे वर्षभर भाजीपाला पुरवठा असे आहे.

        त्यामुळे तेथील कृषी पद्धती व कृषी प्रकाराचा अभ्यास प्रस्तुत उपक्रमात करण्यात आला याकरिता भूगोल विभाग व प्रा डॉ. हरीश लांजेवार व सहाय्यक प्रा गुरुदेव सोनुले पदव्युत्तर भूगोल विभागाचे अभ्यासक विद्यार्थी व लाडज येथील सरपंच ग्रामविकास अधिकारी प्रा विकास वाडगुरे व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले भूगोलशास्त्र अभ्यासकांनी भूरूप शास्त्रज्ञांनी पर्यावरण अभ्यासक कृषी अभ्यासक व आपत्ती व्यवस्थापक यांनी लाडज येथील सर्व घटकांचे अध्यापन व अध्यापन करावे असे भूगोल विभाग प्रमुखांनी आवाहन केले आहे.