मध्यप्रदेशात बसपा लढणार दमदारपणे विधानसभा निवडणूक… — आतापर्यंत ७८ उमेदवारांची यादी जाहीर.. — आणि षडयंत्र….

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक

           बहुजन समाज पार्टी मध्यप्रदेशात दमदारपणे विधानसभा निवडणूक लढण्याच्या जय्यत तयारीने मैदानात उतरली असून आतापर्यंत ७८ उमेदवारांची यादी बसपा सुप्रिमो बहन मायावती यांनी जाहीर केली आहे.

                मध्यप्रदेश मध्ये विधानसभा क्षेत्रातंर्गत २३० मतदार संघ असून या राज्यात बऱ्याच भागात बसपाचा जनाधार मजबूत व प्रभावी आहे.मध्यप्रदेशात बसपाचा जनाधार कमी करण्यासंबंधाने भाजप व कांग्रेसनी खूप प्रयत्न केलीत.मात्र बसपाचा जनाधार कमी करण्यास त्यांना अजूनपर्यंत यश आले नाही.

           सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले,आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज,युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि इतर बहुजन संत यांच्या विचार धारेवर चालणारी व त्यांच्या विचारधारेला अनुसरून सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,आर्थिक क्षेत्रात पकड मजबूत करीत यशस्वी होणारी,”बहुजन समाज पार्टी,.”ही एकमेव राष्ट्रीय पार्टी,..”भारत देशात आहे…

              महात्मा ज्योतिबा फुले,राजश्री छत्रपती शाहू महाराज,युगप्रवर्तक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार धारेला अनन्यसाधारण महत्त्व देत सामाजिक व राजकिय क्षेत्रात परिवर्तन घडवून आणित देशातंर्गत बहुजन समाजातील नागरिकांना सामाजिक स्तरावर मानसन्मानाने जिवन जगण्याचा व राजकिय क्षेत्रात दमखमपणे लढण्याचा मार्ग खुला केलाय हे नाकारुन चालणार नाही.

             यामुळे बसपाला कमजोर व प्रभावहीन करण्यासाठी आणि बसपाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कमी करण्यासाठी,या देशात अनेक सामाजिक संघटनांना व राजकिय पक्षांना कामाला लावले गेले असल्याचे त्यांच्या वैचारिक हालचाली वरुन व त्यातंर्गत त्यांच्या भुमिका वरुन लक्षात आल्यावाचून राहात नाही.

           मात्र,बसपाचा राष्ट्रीय दर्जा कमी होऊ नये यासाठी मध्यप्रदेशातील मतदारांनी आतापासूनच मने बनवली असून बसपाच्या पाठीमागे राहण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.

          बसपाला कमजोर व प्रभावहीन करण्यासाठी राजकीय व सामाजिक स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न झालेत व अजूनही सुरु आहेत.परंतू बसपाला मानणारा वर्ग हा वैचारिक शिध्दांता नुसार एकसंघ व जागरुक असल्याने आजपर्यंत सर्व विरोधकांना बसपाला कमजोर व प्रभावहीन करता आले नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे.

           बसपाचा राष्ट्रीय दर्जा कमी झाल्यास देशातंर्गत बहुजन समाजातील नागरिकांना भ्रमीत करता येईल व त्यांना विघटित करता येईल,त्यांना शक्तीहिन करता येईल,त्यांच्यावर मनुवादी व ब्राम्हणवादी विचारांचा प्रभाव पाडता येईल,यासाठी मनुवादी व ब्राम्हणवादी टपून आहेत.

                 इतर नवीन पक्षांची जन-ताकद नसताना त्यांच्या सभाना होणारी संभाव्य गर्दी बघता,मनुवादी संघटनांचे लोक त्यांच्या सभेला गर्दी करण्यासाठी आपापले पदाधिकारी व कार्यकर्ते पाठवतात काय?अशी शंका येवू लागली आहे.

               नवीन पक्ष प्रमुखांना,भरगच्च गर्दीतील सभेच्या माध्यमातून पुढे आणणे,बहुजन समाजात त्यांचा प्रभाव पाडण्यासाठी सर्व प्रकारे त्यांना मदत करणे आणि बहुजन समाज पार्टीचा जनाधार कमी करण्यासाठी हरसंभव प्रयत्न करणे,हा कुटनितीचा आणि षडयंत्राचा भाग असावा याकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही.