धानोरा येथील जे एस पी एम महाविद्यालयाचे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुयश.

   भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी 

 धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथील बीएससी भाग द्वितीय चा विद्यार्थी प्रथम वासुदेव कोरेट यांनी बारामती जिल्हा पुणे येथे आयोजित 44 व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत दिनांक 10 ते 12 सप्टेंबर दरम्यान संपन्न झालेल्या कराटे स्पर्धेत रौप्य पदक मिळविले सदर खेळाडूंनी विजयी घोडदोड कायम ठेवली त्याच्या नेत्र दीपक कामगिरीबद्दल संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती शालिनीताई रमेशचंद्र मुनघाटे कार्याध्यक्ष सौ आशाताई रोहनकर सचिव सौ मीनलताई सहानी सहसचिव सौरभ मुनघाटे तथा संस्थेचे सर्व पदाधिकारी शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा डॉ संजय मुरकुटे प्राचार्य डॉ पंकज चव्हाण सर्व प्राध्यापक वृंद तसेच प्रशासकीय कर्मचारी यांनी त्याच्या यशाबद्दल अभिनंदन केले.