जे एस पी एम महाविद्यालय धानोरा येथे भूगोल विभागातर्फे जी आय एस व नौकरी संधी यावर तज्ञांची मार्गदर्शन व चर्चा संपन्न.

   भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी 

     धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे भूगोल विभागातर्फे महाविद्यालयात जी आय एस व नोकरी संधी यावर तज्ञांची मार्गदर्शन घेण्यात आले.

       याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंकज चव्हाण सर हे अध्यक्षस्थानी होते. तर विशेष अतिथी रोशन दुधबावरे जीआयएस एक्सपर्ट म्हणून उपस्थित होते तर विशेष अतिथी डॉ जम्बेवार डॉ किरमिरे प्राध्यापक पुण्यप्रेड्डीवर प्राध्यापक तोंडरे भूगोल विभाग प्रमुख डॉ लांजेवार सर व प्राध्यापक सोनुले इत्यादी उपस्थित होते.

        याप्रसंगी भूगोल अभ्यास व संशोधन मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.  प्राचार्य व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जीआयएस भौगोलिक माहिती प्रणाली व नौकरी विषयक यावर प्रमुख अतिथी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ लांजेवर सर यांनी केले, तर संचालन कुमारी प्राची बडोदे बीए भाग दोन तर, आभार निकिता राऊत एम.ए. भूगोल भाग २, यांनी केले याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.