राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा तालुक्यातील मौशी वन परिसर व झरी (गोठणगाव)वन परिसरात मोहफुल हातभट्टी शोध मोहिम राबवून मोहफुल सडवा नष्ट करीत मोहफुल दारु जप्ति ची दोन कारवाई करुन अंदाजे २४७०० रु.चा मोहफुल सडवा, १०००० रु ची हाथभट्टी मोहफुल दारु सह मुद्देमाल जप्त करीत तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई कुरखेडा पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे सह पोलिस उपनिरीक्षक दयानंद भोंबे, महिला पोलिस उपनिरीक्षक वर्षा बोरसे,शितल अवचार, पोहवा शेखलाल मडावी, मपोशी किरण मडावी, पोशि.प्रकाश साबडे, नरसिंग कोरे,अंकेश किरसान यांनी केली.कुरखेडा पोलिस स्टेशन हद्दीतून अवैध रित्या दारु विकणाऱ्याच्या विरोधात कारवाई अखंडित पणे राबवून हद्द पारी ची कारवाई करण्याचे उद्देश असल्याचे नुकतेच रुजु झालेले पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी सांगितले.