नागपुर येथे एन. जागतिक मानवाधिकार संघटना विदर्भ प्रदेश कार्यकारणीची सभा उत्साहात व प्रसंन्नचित्तात संपन्न… — अन्यायाचे-अत्याचाराचे उच्चाटन करण्यासाठी व अनेक प्रकारचे शोषण थांबविण्यासाठी कार्य करुया:- राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नरवडे..   — विदर्भ प्रदेश सहसंघटक निलय झोडे यांच्याकडून,”भारतीय संविधानाच्या प्रती,पदाधिकाऱ्यांना भेट.. — राष्ट्रीय महासचिव बुधराव कोटनाके,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अभिजित सेज्वल,विदर्भ प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके,मेश्राम मॅडम यांचे सयुक्तीक मार्गदर्शन..

प्रितम जनबंधू

    संपादक

नागपुर:-

         एन.जागतिक मानवाधिकार संघटनातंर्गत पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे महत्त्वपूर्ण असे कायदेशीर कार्य केली जात आहेत.तद्वतच सर्व समाज घटकांतील वंचित, पिडीत, अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त, शोषीत नागरिकांसाठी कार्य करणे व कर्तव्य पार पाडणे हा संघटनेचा मुख्य उद्देश असून मानवाधिकारांचे हनन शासन-प्रशासनाकडून होणार नाही याची खबरदारी संघटनेचे पदाधिकारी घेत आहेत.यामुळेच अन्याय-अत्याचाराचे उच्चाटन करण्यासाठी व अनेक प्रकारचे शोषण थांबविण्यासाठी कार्य करुया,असे न्यायसंगत व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नरवडे यांनी केले.

           ओरिएंन्ट ब्रान्ड नागपूर हाॅटेल येथे विदर्भ कार्यकारणीची सभा दिनांक १७ मार्चला संपन्न झाली.या सभेच्या अध्यक्षस्थानी एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नरवडे हे होते तर मुख्य मार्गदर्शक म्हणून संघटनेचे राष्ट्रीय महासचिव बुधराव कोटनाके हे प्रामुख्याने उपस्थित होते.

          याचबरोबर विशेष मार्गदर्शक म्हणून संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अभिजित सेज्वल व विदर्भ कार्यकारणीचे कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके,सरचिटणीस प्रदीप शेंडे, दर्शनाताई मेश्राम मॅडम यांची आवर्जून उपस्थिती होती.

             दिनांक १७ मार्च २०२४ रोजी नागपुर येथील होटल ओरीएंट येथील सभागृहात नरवडे जागतीक मानवाधिकार संघटना विदर्भ प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक तथा स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

         सदर आढावा सभेलाला व स्नेहमिलन सोहळ्याला महाराष्ट्र राज्यातील अनेक पदाधिकाऱ्यांसह विदर्भ प्रदेश कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.

***

        जागतीक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नरवडे सरांनी अध्यक्षीय मार्गदर्शनातून संघटनेच्या पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला तद्वतच संघटनेची कार्यपद्धत,मानवाधिकार,मानवाच्या हिताचे रक्षण कशाप्रकारे करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.सोबतच संघटनेची कर्तव्ये, अधीकार,महत्व विस्तृतपणे विषद केले. 

***

       संकटावर मात करुन खंबीर नेतृत्व जोपासत निर्भीड कार्यप्रणालीतून प्रज्ञा,शिल,करुणेचा अंगीकार करुया व संघटनेसाठी अनवरत कार्य करुया आणी समाजहीतपयोगी कार्य करण्यास संघटनेच्या माध्यमातून सजग राहूया असा मौलिक संदेश आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून आ.प्रदिप रामटेके सरांनी दिला.तद्वतच विस्तारलेल्या कार्यातंर्गत प्रसंगी बदलणारी कार्यपद्धत ओळखण्याची क्षमता आपल्यात आणल्या गेली पाहिजे या अनुषंगाने त्यांनी विविध प्रकारचे उदाहरणे देऊन कर्तव्याची स्पष्टता समजावून दिली.

***

        संघटनेच्या उणीवा दुर करण्यासाठी आणि संघटना व कार्यकर्ते याना एकसंघतेत बांधुन ठेवणारे खंबीर नेतृत्व संघटनेचे हवे.तरच संघटना टिकण्यास व सामान्य जनतेच्या हिताचे कार्य निर्भीडपणे करण्यास जागतीक मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून अनवरत जनहितार्थ कार्य घडतील अशा आशावाद श्रीमती मेश्राम मॅडम यानी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केला.

**

      संघटनेचे राष्ट्रीय महासचिव बुधराव कोटनाके,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अभिजित सेज्वल यांनी सुध्दा आपल्या अनुभवातून बरेच कार्य व कर्तव्ये कसे पार पडली जातात याबाबत सविस्तर माहिती दिली.

***

भारतीय संविधान भेट.‌.

      सदर कार्यक्रमात जागतिक मानवाधिकार विदर्भ प्रदेश कार्यकारिणीच्या व इतर पदाधिकाऱ्यांना विदर्भ प्रदेश कार्यकारिणीचे सहसंघटक श्री. निलय झोडे सरांकडून,”भारतीय संविधान,उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.तद्वतच विदर्भ प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात आले.

***

      नियोजीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ प्रदेश कार्यकारिणीचे संघटक ऋषी सहारे सर यानी केले तर कार्यक्रमाचे संचालन विदर्भ कार्यकारिणीचे उपाध्यक्ष प्रितम जनबंधु सर यानी केले तर आभार विदर्भ कार्यकारणीचे सचीव दामोधर रामटेके सर यानी मानले. व शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

            यावेळी विदर्भ प्रदेश कार्यकारणीचे पदाधिकारी सर्वश्री संघटक ऋषी सहारे,कोषाध्यक्ष दिक्षा कऱ्हाडे,उपाध्यक्ष प्रितम जनबंधू,सचिव शेखर ईसापूरे,सचिव दामोधर रामटेके,सल्लागार जाकीर सैय्यद,सहसंघटक निलय झोडे, सहसंघटक ऋग्वेद येवले,सहसंघटक रोहन आदेवार, विभागीय अध्यक्ष ताराचंद मेश्राम,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम,यासह महाराष्ट्र राज्यातील व नागपूर येथील पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

       १७ मार्चला विदर्भ प्रदेश कार्यकारिणीच्या सभेचे सुरुवात अतिशय उत्साहात झाली तर सांगता प्रसंन्नचित्तात झाली.

***

सभेचे विविध क्षणचित्रे