महाराष्ट्र शासनातर्फे बोधी फाऊंडेशनचा सत्कार……

प्रितम जनबंधु

    संपादक 

       दिनांक १२ मार्च २०२४- समाज कल्याण व विशेष सहाय्य विभागाने बोधी फाऊंडेशनच्या कार्याची दाखल घेऊन मंगळवार दि १२ मार्च २०२४ ला नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्ट ( ncpa ) मुंबई येथे फाऊंडेशन चे डॉ ललित खोब्रागडे व अर्चना खोब्रागडे या दाम्पत्याचा सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्री सुमंत कुमार भांगे यांनी सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल व २५ हजाराचा चा धनादेश देऊन सत्कार केला.

                 महाराष्ट्रात सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली बोधी फाऊंडेशन ही संस्था सन २००६ पासून कार्यरत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबसाहेबांचे विचार, जन सामान्यानमध्ये पेरण्याचे महान कार्य बोधी फाऊंडेशन ही संस्था करत आहे. 

             डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय विभागाने, बोधी फाऊंडेशन निर्मित “राजगृहाची निळी स्पंदने” हा १२५ कलावंतांचं मेगा म्यूजिकल शो महाराष्ट्रात विविध ठिकाणी आयोजित केला होता. त्यातूनच बोधी फाऊंडेशनच्या कार्याची ओळख शासनाला झाली होती. 

            डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ११८ व्या जयंती निमित्त ६४ तास सतत गायन करून गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करणारी ही संस्था त्यासोबतच सांविधानिक मूल्य समाजात पेरण्याचे महत्वाचे कार्य करतांना कबड्डी, हॉकी या सारख्या टुरणामेंट, मेडिकल हेल्थ शिबिर, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, थिएटर, फिल्म आणि पेंटिंग वर्कशॉप, आदिवासी बहुल भागातील महिलांचे आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने कार्यक्रम राबविणे ईत्यादीच्या माध्यमातून तरुण पिढीला एकत्रित करून बाबासाहेबांचे राष्ट्र निर्मितीचे विचार त्यांच्यात रुजविण्याचे कार्य सतत करीत असल्याने शासनाने, बोधी फाऊंडेशनचा गौरव केला आहे. 

           याबाबत समाजातून खोब्रागडे दाम्पत्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.