बोगस,डुप्लीकेट,निकृष्ट दर्जाचा सुगंधीत तंबाखू व गुटखा तस्करी प्रकरणाची चौकशी करून माफियास तात्काळ अटक करावी.:- चिमूर तालुका कांग्रेसची मागणी… — सामान्य माणसांच्या जिवनाशी खेळ खेळणाऱ्या तस्करांची कृती सहन करण्यापलीकडे..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

              वृत्त संपादीका

        चिमुर तालुक्यात अनेक प्रकारचे अवैध व्यावसाय सुरू आहेत.अवैधरित्या व बेकायदेशीर होणारे रेतीचे उत्खनन,बिनधास्त सुरू असलेला सट्टा व्यवसाय,बोगस तंबाखू व गुटख्याची जोमात असलेली विक्री गंभीर आणि घातक आहे.या सर्व व्यवसायास राजकीय व प्रशासकीय सरंक्षण दिल्या जात आहे.यामुळे सदर अवैध व्यावसायिकांना वेळीच आवर घालणे आवश्यक आहे आणि सखोल चौकशी अंतर्गत सर्व माफीयांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे निवेदन चिमूर तालुका काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांद्वारे उपविभागीय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी किशोर घाडगे यांना देण्यात आले.

         दि.१५/०३/२०२४ ला तालुका सावनेर जि.नागपुर या पोलीस स्टेशन हददीतील हेटी पोलीस चौकीच्या ठिकाणी गस्त सुरू असतांना भाजपचा झेंडा लावुन असलेली MH-34,BR-1331 या पांढ-या रंगाच्या अर्टिका गाडीची तपासणी केली असता ३ लाख १ हजार रूपयाचा तंबाखु व गुटखा आढळून आलाय.यामुळे चिमूर तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांना सावनेर पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्यावर विविध कलमातंर्गत गुन्हे दाखल केले.तद्वतच सदर चारचाकी वाहनालाही जप्त केले.

           आरोपींवर भांदवी कलम २७२,२७३,१८८ व ३२८ व अन्न सुरक्षा कायदा २००६ या कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.चिमुर शहरातील भाजपचे नामांकित कार्यकर्ते आणि आमदार भांगडीया यांचे निकटवर्तीय तथा नंदीनी ट्रॅव्हल्सचे मालक नरेंद्र हजारे,पंकज गोठे,भाजपा युवा मोर्चाचे तालुका महामंत्री व खडसंगी जि.प.सर्कल प्रमुख रोशन बन्सोड यांचा सहभाग आहे.

         परंतु यातील रोशन बन्सोड हा आरोपी फरार आहे.हे सर्व आरोपी चिमुर व खडसंगी परिसरातील रहिवासी आहे.ते अनेक वर्षांपासून बोगस तंबाखू व गुटख्याची विक्री करून सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ खेळीत आहेत. 

          तसेच रेती तस्करी,सट्टा पटटी,दारूबंदीच्या काळापासून अवैध दारू विक्री असे अनेक अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत.यामधुन मिळणारी अवैध रक्कम ही राजकारणात वापरली जात असल्याचे आरोप होत आहेत. 

        सन २०२४ च्या घोषित झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व नकली सुगंधीत तंबाखु व गुटखा याचा वापर करून व जनतेला प्रलोबन देऊन भाजपला मतदान करायला लावण्यासाठी हा साठा चिमुर तालुक्यात आणण्यात येत होता.या सर्व प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिमुर तालुका आणि चिमुर मतदारसंघ सुरक्षित नाही.अशा वातावरणात निवडणुका सुद्धा शांततेत पार पाडणार नाही हेही यावरून स्पष्ट होत आहे.सदर बाब अत्यंत गंभीर असून यामध्ये भाजपाच्या स्थानिक आमदाराची सुद्धा चौकशी होणे आवश्यक आहे. 

         या व्यवसायाचे धागेदोरे लांब असुन बोगस खते,बोगस तंबाखु व गुटखा चिमूर तालुक्यात विक्री केली जात आहे.तंबाखू तसेच गुटखा या व्यवसायातंर्गत चिमूर विधानसभा मतदारसंघात जोरात विक्री केली चालत आहे.

       कारण या ठिकाणी तंबाखू व गुटखा हा अतिशय स्वस्त दरात मिळत असल्याची माहिती आहे. चिमुर तालुक्यात विकण्यात येतो तो तंबाखू निकृष्ट दर्जाचा आहे.जनतेच्या जिवाशी व आरोग्याशी खेळणारा हा प्रकार आहे.अशा बोगस तंबाखू व गुटखा तस्करी प्रकरणाचा छडा लावुन माफिया आरोपीची कसुन चौकशी करून या संपूर्ण टोळीचा पर्दापाश करावा अशी मागणी चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे निवेदनातंर्गत करण्यात आली.याचबरोबर पत्रकार परिषद घेऊन उपविभागीय अधिकारी चिमूर यांना निवेदन देण्यात आले.

               यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ.सतिश वारजुकर,चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजय गावंडे पाटील,चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटी सरचिटणीस गजानन बुटके,उपाध्यक्ष राजेश चौधरी,विलास मोहिणकर तालुका सरचिटणीस,जेष्ठ नेते विवेक कापसे,शहर अध्यक्ष अविनाश अगडे,तालुका सचिव विजयी डाबरे,उपाध्यक्ष ऍड.वंजारी, माजी नगरसेवक नितीन कटारे,मीडिया प्रमुख पप्पू शेख,बंडू हिवरकर,श्रीकांत गेडाम,सुधीर जुमडे,सुधीर भोयर,मंगेश घ्यार,अक्षय लांजेवार,बाळू बोबाटे,मिलिंद सहारे,रोशन नंन्नावरे,उपस्थित होते.