विशेष सहाय्य योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी आपले कागदपत्रके ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावे या अनुषंघाने तहसील कार्यालयद्वारे आव्हान…

    रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि

चिमूर:-

          विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य शासन पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला असुन तसे निर्देश प्राप्त झाले आहेत.

            या योजनेत समाविष्ट सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे आवश्यक झाले आहे. याकरिता लाभार्थ्यांनी आपले 1) आधार कार्ड २) बँक पासबुक ३) राशन कार्ड यांचे झेराक्स व त्यावर मोबाईल नंबर टाकून संबधित ग्रामपंचायत सरपंच /तलाठी/कोतवाल यांचे कार्यालयात जमा करावेअसे आवाहन तहसिल कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे.