वृद्ध कलावंतांच्या मानधनात 5000 वाढ केल्याबद्दल प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले यांनी मानले शासनाचे आभार…

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

         साकोली -प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या वतीने 5 वर्षा पासून नेहमीच कलावंतांच्या मागणीचे निवेदन शासनाला आमदार, खासदार, जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब यांच्या मार्फत पाठविण्यात आले होते.

        त्यामध्ये कोरोना पॅकेज मिळायला पाहिजे, वृद्ध कलावंतांचे मानधन 5000 मिळायला पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी शासनाला निवेदन दिले होते.

       संघटनेच्या निवेदनाचा विचार करून शासनाने वृद्ध साहित्यिक कलावंतांच्या मानधनात वाढ करून 5000 रुपये केले, तसेच जिल्ह्यात 3 वर्षा पासून कलावंत मानधन निवड समिती नाही ती सुद्धा लवकर स्थापन करून कलावंतांना मानधन मिळायला पाहिजे यासाठी शासनाने प्रयत्नशील राहावे.

          5000 रुपये मानधनात वाढ केल्यामुळे संघटनेच्यावतीने जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले, प्रबोधनकार मनोजभाऊ कोटांगले , राकेश वालदे जिल्ह्यातील पदाधिकारी मनोज बोपचे, संजय टेम्भुणे, ईश्वर धकाते, यशवन्त बागडे, प्रल्हाद भुजाडे, धनंजय धकाते, तीर्थानंद बोरकर , विनोद मुरकुटे, क्रीष्णा हातझाडे, मनोहर गंथाळे, जासूद ठाकरे, संदीप नागदेवे, उमेश भोयर,संदीप कोटांगले, सोनू मेश्राम जेष्ठ कलावंत भूमाला उईके,प्रतिभा साखरे, अर्चना कान्हेकर, दिपाली यावलकर, रेश्मा भाग्यवंत,गीता रामटेके,आदेश खेडीकर, किशोर भाग्यवंत, सुशील खांडेकर, सुरेंद्र उके, सोमप्रभु तांदूळकर, रुपेश खोब्रागडे, आकाश भैसारे, संतोष फसाटे, रोशन राखडे, अक्षय मेश्राम, राहुल कापगते, पुण्यशील कोचे,अरविंद कांबळे ,स्वप्नील बन्सोड, नाना ठवकर,महेंद्र गोंडाने, उत्तम मेश्राम, अरविंद शिवणकर व जिल्ह्यातील सर्व स्तरीय कलावंतांनी शासनाचे आभार मानले.