सुगंधित तंबाखूची वाहतूक करतांना चिमूर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी अटकेत.. — फरार आरोपी गवसेल काय? — सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना..

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

चिमूर : – सावनेर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत मौजा हेटी पोलीस चौकी याठिकाणी गस्त सुरू असताना API मुसनवार यांनी रात्री ०९:०० वाजता वाहन क्रमांक. MH34,BR 1331 या पांढऱ्या रंगाच्या व भाजपचा झेंडा लावून असलेल्या अर्टिका कारची तपासणी केली असता ३ लाख १ हजार रुपयांचा सुगंधीत तंबाखु आढळून आल्याने कारसह सुगंधित तंबाखू जप्त केलाय.जप्त केलेल्या मुद्देमालाची किमंत ११ लाख १ हजार रुपये आहे.

     भांदवी कलम २७२,७३,१८८,३२८ व अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

       आरोपी मध्ये चिमूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांच्या अगदी जवळचे भाजपचे नामांकित पदाधिकारी व नंदिनी ट्रॅव्हल्सचे मालक नरेंद्र राजाराम हजारे वय ३८ वर्षे राहणार चिमूर,पंकज मनोहर गोठे वय २३ वर्षे राहणार चिमूर तसेच रोशन मधुकर बनसोड भाजपा युवा मोर्चाचे तालुका महामंत्री,तसेच खडसंगी जिल्हा परिषद सर्कल प्रमुख राहणार खडसंगी वय ३० वर्षे यांचा समावेश आहे.

         सुगंधित तंबाखू व गुटखा सह मुद्देमाल जप्त करून संबंधित तिघांना अटक करण्यात आली आहे.यातील भाजपचे महामंत्री रोशन बनसोड हे फरार असल्याने त्यांचा सावनेर पोलीस यांचेकडून कसून शोध सुरु आहे. 

        तिघांच्या व्यतिरिक्त आणखी भाजपाचे पदाधिकारी सुगंधित तंबाखू तस्करी मध्ये समाविष्ट आहेत काय?याबाबत सावनेर पोलिस स्टेशनचे ठाणेदार व चिमूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अधिक चौकशी करतील असे सध्या तरी सांगता येत नाही.

       तद्वतच चिमूर तालुकातंर्गत रेती चोरी करण्यात भाजपचे पदाधिकारी आघाडीवर असल्याची खमंग चर्चा जनमानसात आहे.