जे.एस.पी.एम.महाविद्यालयात निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधि 

            जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालय धानोरा येथे वर्ग अकरावीच्या विद्यार्थ्याकडून वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.या कार्यक्रमाचे महाविद्यालय प्राचार्य डॉ.पंकज चव्हाण सर हे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.राजु किरमिरे,प्रा.डॉक्टर डी.बी. झाडे सर,प्रा.डॉ.विना जम्बेवार मॅडम,प्रा.डॉ.लांजेवार सर,प्रा.धाकडे सर,प्रा.रणदिवे सर हे मंचावर उपस्थित होते.

       कार्यक्रमाची सुरुवात श्री.साईबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.भाविकदास करमणकर यांनी केले.त्यांनी कार्यक्रमाची रूपरेखा व बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.तसेच मान्यवरांनी वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

        21 तारखेपासून सुरू होणाऱ्या परीक्षेला कसं सामोर जावे व कोणतेही मानसिक स्थिती किंवा दडपणात येऊ नये अशा प्रकारचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.पंकज चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थानी कोणत्याही दडपणात न येता व कोणत्याही गैरवर्तनाला बळी न पडता अभ्यास करून पेपर सोडवावा व महाविद्यालयाचे नाव लौकिक करावे,तसेच विद्यार्थ्यांनी नवनवीन उंच शिखरे गाठावी असे मुलाना मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.

        या कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षेला जाता जाता 20 मिनिटांचा व्हिडिओ क्लिप हरिओम कॉम्प्युटर धानोराचे सहसंचालक भाष्कर कायते यांच्या मार्गदर्शनात दाखविण्यात आला.

      यावेळी महाविद्यालयाचे प्रा.नितेश पुण्यप्रेड्डीवार,प्रा.मानतेस तोंडरे,प्रा.डॉ.प्रियंका पठाडे,प्रा.भैसारे मॅडम तसेच प्रशासकीय कर्मचारी श्रीमती सजनपवार,गणेश लांबट,हरीश गोहणे उपस्थित होते.

       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी बालाजी राजगडे,भास्कर वाढणकर व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन धृप मोहुर्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारो पोटावी हिने मानले.

     कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.