जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा येथे “छत्रपती शिवाजी महाराज” जयंती साजरी…

 भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधि 

      जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे सुरुवात राज्य गीताने करण्यात आली.

            कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रिष्णा भुरकुर्या शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गावातील पोलीस पाटील जगदीश मातलामी व शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ.आशाताई पदा,शामराव मडावी बाजीराव मडावी,सौ.जमूना मडावी, रशिकला मडावी हे होते कार्यक्रमचि सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलित करून केले.

           अध्यक्ष महोदयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन चरित्र्यावर मार्गदर्शन केल व विद्यार्थ्यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.त्यानंतर मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विद्यार्थी यांची सेल्फी काढण्यात आली.प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वृध्दींगत होण्यासाठी वाचन सवय प्रतिज्ञा देण्यात आली.