धानोरा येथे आनंदाचा शिधा वाटप…

 भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधि 

              स्वस्त धान्य दुकान धानोरा क्रमांक 3 येथे आज दिनांक 19/02/2024 रोजी सोमवार आनंदाचा शिधा श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराष्ट्र शासना तर्फे 100 रुपयात किट वाटप करण्यात आला.

            वाटप करत असताना सौ. अलकाताई मशाखेत्री नगर सेविका प्रभाग क्रमांक 1 धानोरा तसेच सौ. वैशाली धाईत नगर सेविका प्रभाग क्रमांक 2 धानोरा तसेच सौ. प्रतीक्षा गुंडावार नगर सेविका प्रभाग क्रमांक 3 धानोरा यांच्या हस्ते स्वस्त धान्य दुकान क्रमांक 3 समीर कुरेशी यांच्या दुकानात वाटप करण्यात आले. या वेळी कार्ड धारक उपस्थित होते.