राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती उत्सव पिंपरी बुद्रुक येथे राजमुद्रा प्रतिष्ठान ग्रुप व ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

          पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती उत्सव वाजत गाजत साजरा करण्यात आला.

        राजमुद्रा प्रतिष्ठान पिंपरी बुद्रुक व शिवछत्रपती प्रतिष्ठान पिंपरी बुद्रुक यांच्या सर्वच शिवप्रेमी आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा करण्यात आला. राजमुद्रा प्रतिष्ठान व गावातील ग्रामस्थ सकाळी आठ वाजता लोकनेते कैलासवासी महादेवराव बोडके दादा विद्यालयाच्या प्रंगणातील राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

            पिंपरी बुद्रुक येथील शिवभक्त बाळासाहेब मगर व रामदास नागरे यांच्या हस्ते प्रतिमेची पूजा व हार श्रीफळ फोडून करण्यात आली. त्यानंतर सर्वच आजी, माजी, सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन, पोलीस पाटील, ग्रामस्थ आणि तलाठी भाऊसाहेब, ग्रामसेवक या सर्वांच्या हस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन हलगी झांज वाजऊन, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, आशा घोषणा देऊन शिवाजी महाराजांची पुजा करण्यात आली. तरुण कार्यकर्ते शिवभक्त व शाळेतील लहान विद्यार्थी यांनी लेझीम खेळत ग्राम प्रदक्षिणा गावातून काढण्यात आली.

                शिवजयंती साठी आलेले सर्वच शिवप्रेमी व ग्रामस्थ यांना सकाळी नऊ वाजता भोजन विद्यमान सरपंच भाग्यश्री बोडके व सरपंच सुदर्शन बोडके यांच्या वतीने देण्यात आले. राजमुद्रा ग्रुपचे सर्वच कार्यकर्ते शिवप्रेमी यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांचा शिवसंस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आला. पहिल्या दिवशी लहान गटामध्ये विद्यार्थ्यांची कला गुण पाहण्यासाठी पालकांचीही मोठ्या प्रमाणात हजेरी होती. संगीत आणि गाण्यांच्या तालात विद्यार्थ्यांची कला बघून सर्वच प्रेक्षकांची मने जिंकली.

                कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांकडून विद्यार्थ्यांना प्रत्येक गाण्यासाठी शेकडो रुपये बक्षीसही मिळाले.