माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील प्रयोगशाळा सहाय्यकांची बारा वर्षांनंतरची वेतनश्रेणीत होणार दुरुस्ती. — अनिल शिवणकर यांच्या प्रयत्नाला यश…

 भाविक करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

            प्रयोगशाळा सहाय्यकांची कालबद्ध पदोन्नतीची वेतन निश्चिती एस – ८ करण्यात यावी याकरिता अनिल शिवणकर पूर्व विदर्भ संयोजक, भाजप शिक्षक आघाडी यांच्या नेतृत्वात दिनांक 18/ 12 /2023 ला ना. शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना निवेदन देण्यात आले.

            राज्यातील खाजगी प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी मंजूर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यकांची वेतनश्रेणी नमूद केलेली नाही परंतू 23 जिल्ह्यात 2016 पासुन 12 वर्ष सेवा झालेल्या प्रयोगशाळा सहाय्यकांना एस-8 झालेले आहे तर विभागीय स्तरावर सुध्दा तीन जिल्ह्यात एस-8 प्रमाणे वेतन निच्छीती करण्यात आलेली आहे.

             परंतु (नागपूर,गडचिरोली,वर्धा) जिल्ह्यात एस-7 नुसार वेतन निच्छीती करण्यात आल्यामुळे, समान काम समान वेतन यानुसार होणे आवश्यक होते परंतू 2016 पासुन 12 वर्ष सेवेनंतर वेतन निच्छीती तफावत पूर्वलक्षी प्रभावाने दूर करण्याकरिता निवेदन देण्यात आले आहे.

               त्यावेळी अनिल शिवणकर भाजपा शिक्षक आघाडी विभागीय अध्यक्ष नागपूर विभाग नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच गडचिरोलीचे अध्यक्ष भास्कर कायते, नागपूरचे ज्ञानेश्वराव उंमरे तसेच गुणवंतराव आत्राम उपस्थित होते त्यावेळेस दिपक केसरकर यांनी आश्वासन दिलेले आहे. 

         प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ पदाधिकारी मुंबई, तसेच महाराष्ट्रातील सर्व प्रयोगशाळा कर्मचारी ह्यांनी अनिल शिवणकर यांचे आभार मानले.

           तसेच गडचिरोलीचे अध्यक्ष भास्कर कायते, ज्ञानेश्वर उमरे, व गुणवंत आत्राम ह्यांच्या सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे नक्कीच यश मिळणार असा कर्मचारी बांधवांनी विस्वास व्यक्त केलेला आहे.