वैरागड ग्रामसभेत ‘ सारथी ‘ ची जनजागृती. – स्वतंत्रादिनी ग्रामपंचायत वैरागड मध्ये कार्यक्रम आयोजन – मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा जास्तीत-जास्त सहभाग वाढवा यासाठी या संस्थेचे कार्य. – प्रिन्स कॉम्प्युटर वैरागडाचे संचालक आणि विद्यार्थिनी ग्रामस्थांना दिली माहिती.

प्रतिनिधी : – प्रलय सहारे

वैरागड : – मराठा आणि कुणबी-मराठा समाजासाठी कार्य करणारी ‘ सारथी ‘ नावाची संस्था विद्यार्थ्यांसाठी विविथ क्षेत्रात कार्य करत आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी वैरागड ता. आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे स्वतंत्रादिनी ग्रामपंचायत मध्ये कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.

 

पीचडी स्कालशीप, एमपीएससी, युपिएससी यासारख्या क्षेत्रात मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा जास्तीत-जास्त सहभाग वाढवा यासाठी या संस्थेचे कार्य सुरूच आहे.

यावर्षी या संस्थेने प्रथमच संगणक क्षेत्रात पाऊल टाकत आहे. प्रिन्स कॉम्प्युटर वैरागड आणि सारथी यांच्या संयुक्त विद्यमाने ही संस्था ३० हजार रुपयांचा सीएसएमएस – डीप डिप्लोमा कोर्स अगदी मोफत देत आहे. याची माहिती गावातील प्रत्येक विद्यार्थी आणि ग्रामस्थांपर्यंत पोहचविण्यासाठी १५ ऑगस्टचे औचित्य साधून वैरागड येथील ग्रामस्थांना सारथिच्या विविध योजना, जसे की परदेशी भाषा प्रशिक्षण, दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती, कृषी विभागात विविध योजना, सध्या नव्याने ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी सारथी पुढे कार्य करत आहे.

याच सगळ्या उपक्रमांची माहिती प्रिन्स कॉम्प्युटर वैरागडाचे संचालक राजू कांबळे आणि विद्यार्थिनी मयुरी राजेंद्र तावेडे यांनी ग्रामस्थांना दिली. यावेळी सरपंचा संगीता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडणे, ग्रामपंचायत सदस्य विलास तागडे, आदेश आकरे, छाणू मानकर, भंडारेश्वर देवस्थान समिती अध्यक्ष बालाजी पोफळी, सचिव विश्वनाथ ढेंगरे, ग्रामविकास अधिकारी प्रभाकर बोदेले, अजी-माजी विद्यार्थी, गावातील युवक, शाळेतील शिक्षक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.