पावसाने पाठ फिरवली तरीही साखर कारखान्याच्या नियमाप्रमाणे ऊस लागवडीची कामे शेतकऱ्याला करावी लागतात.

 

निरा नरसिंहपुर दिनांक 18

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

 नरसिंहपूर ते बावडा परिसरात आडसाली ऊस लागवडीची कामे विस टक्के शेतकऱ्यांची चालू आहेत. तर चालू उभ्या पिकाची ताण भागेल का नाही याची चिंता शेतकऱ्याला लागलेली आहे. पावसा अभावी शेतकरी आडचणीच्या संकटात सापडकलेला आहे.

साखर कारखानदारीचा नेम व वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन कारखान्याच्या नियमाप्रमाणे शेतकरी बळीराजाला उसाची लागवड करावीच लागते.

नीरा व भीमा नद्यांचा संगम आसलेला बावडा ते नरसिंहपूर परिसर आसुन.

नीरा नदीचे पात्र कोरडे पडले तर भिमानदीने तळ गाठला या पिकाची तहान भागणार का याकडे डोळे लावून शेतकरी बघत आहे.

 निसर्ग मेघराज्यावर विश्वास ठेवून पाऊस पडणारच अपेक्षा धरून शेतकरी राजा स्वतःच्या जमिनीत उसाची लागवड कांडी बुडवून करू लागला आहे.

एकीकडे शेतकरी आडचणीच्या विळख्यात सापडलेला आहे पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर वाढू लागला. पावसा आभावी काही शेतकरी ऊस लागवड करीत नाहीत ज्या ज्या शेतकऱ्याकडे बोर विहीर नदीवरील पाईपलाईन हे सादन आसताना सुद्धा काही शेतकरी पावसा आभावी ऊस लागवड करीत नाहीत.

तर चालू उभे पिके ऊस मका कडवळ डाळिंब, केळी, फळभाज्या, वांगी, गवार, बटाटा, टोमॅटो, कांदा,मिरची,काकडी, यासारखे पिके जोपासण्या साठी कसरत करावी लागत आहे.

काही शेतकरी उसाची लागण वडुन जशीच्या तशीच ठेवत आहेत. पावसा आभावी शेतकरी लागवड करीत नाहीत.

उर्वरित 20 टक्के शेतकरी वर्ग ऊसाची लागवड करीत आहे.