१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन जि.प.शाळा रामगाव कडुन गावातील माजी सैनिकांचा सत्कार…

 

युवराज डोंगरे/खल्लार

खल्लार येथून जवळच असणा-या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा रामगाव येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन ज्यांनी ज्यांनी देशाकरीता सेवा दिली असे रामगाव चे माजी सैनिक श्री किशोरभाऊ निंबाळकर , श्री रामदासभाऊ वानखडे, श्री गजानन चारथळ यांचा जिल्हा परिषद शाळा रामगाव च्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडुभाऊ घरडे यांच्या अध्यक्षतेखाली शाल श्रीफळ व पुच्छगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच ग्रामपंचायत रामगाव कडुन १५ व्या वित्त आयोगातुन जिल्हा परिषद एका वर्ग खोलीला ५८ हजार रुपये खर्च करुन स्टाईल बसवुन व रंगरंगोटी केल्या बद्दल ग्रामपंचायत चे सरपंच छायाताई घरडे सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य संजुभाऊ घरडे तसेच ग्रामपंचायत सदस्या रजनी संतोष दोडमिसे यांचा शाळेचे मुख्याध्यापक डी.आर.जामनिक तसेच शाळा व्यवस्थापन समिती चे पदाधिकारी व शिक्षक वृंद यांनीशाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच बंडुभाऊ घरडे, सुभाष घरडे ,छायाताई घरडे संजय घरडे यांनी शाळेला खुर्च्या भेट दिल्याबद्दल त्याचे शाळेच्या वतीने पुच्छगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर ज्यांनी कोरोना काळात गावाची सेवा केली अशा आशावर्कर सौ. सुर्यकांता राहुल वानखडे यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडुभाऊ घरडे , उपाध्यक्ष गजानन ढेंबरे, मुख्याध्यापक डी.आर.जामनिक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुभाषभाऊ घरडे, प्रभाकर घरडे , निलेश डोंगरे, सुनिल कव्हळे , व इतर सदस्य गण तसेच पोलीस पाटील दिलीपभाऊ ताजणे ,तसेच जि.प.शाळेच्या सहाय्यक शिक्षीका प्रमिला थोरात, विषय शिक्षीका अंजु वानखडे तसेच सहाय्यक शिक्षक,बाळकृष्ण सोळंके ,तसेच अंगणवाडी सेविका संगिताबाई वसु तथेच ग्रामपंचायत पदाधिकारी,तथा शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला या प्रसंगी गावातील नागरीक उपस्थित होते यावेळी विदयार्थ्याना चॉकलेट, फळ वाटप करण्यात आले

            ग्रामपंचायत कडुन व गावाकडुन असेच सहकार्य लाभो तसेच जिल्हा परिषद शाळा रामगाव येथे सन १९५० पासुन टिन पत्र्याच्या वर्ग खोल्या आहेत ज्या प्रमाणे गावातील लोकांना घरकुल योजना मिळतात त्याच प्रमाणे गावातील विदयार्थी गावाच्या शाळेत येतात.त्यांना शिक्षण घेण्याकरीता कमीत कमी १ वर्ग खोली स्लँप (पक्की) ची वर्ग खोल्या मिळावी अशी मागणी मुख्याध्यापकांनी लोकप्रतिनिधीला केली आहे.कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक डी.आर.जामनिक यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक बाळकृष्ण सोळंके यांनी केले.