राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिमूर अंतर्गत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार नाहीच?.. — उपलेखा परिक्षक राजेश लांडगे यांनी केलेले चाचणी आॅडीट साहाय्यक निबंधक नागपूर यांच्या दालनात नियमानुसार रद्द होण्याची शक्यता… — आॅडीट करतांना बनावट नोंदी व अनागोंदी कारभार झाल्याचा दाट संशय.. — तात्कालीन वेळेत संस्थेची उलाढाल ५ कोटी ६३ लाख ७३ हजार ९४० रुपये असताना, ७ करोड ६६ लाख ९० हजार ५१० रुपयांची अफरातफर कशी काय झाली? — तद्वतच ५ करोड १० लाख ९४ हजार २३४ रुपये ९७ पैसांचे सभासद कर्ज वाटप केले असताना ठेवीदारांचे रुपये कसे काय डुबले? — करोडो रुपये अफरातफर झाला म्हणणे हाच बनवाबनवीचा प्रकार काय?

 

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

          राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था र.न.८०३ मर्यादित चिमूर अंतर्गत करोडो रुपयांची अफरातफर केली म्हणणे,”हाच बनवाबनवीचा प्रकार कदाचित ठरु शकतो.तद्वतच ठेवीदारांच्या हितासाठी या बनवाबनवीच्या प्रकाराला उजेडात आणणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे कायदेशीर कागदपत्रांवरून दिसून येते आहे.

         श्री.मारोती वाल्मिक पेंदोर व श्री.अरुण संभाजी मेहरकुरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना बनवाबनवीच्या प्रकारातंर्गत नाहक बदनाम करणे व अकारण त्यांच्या चारित्र्याला कलंकित करणे,”हा संबंधितांचा प्रकार, समजण्यापलिकडचा नसून सदर प्रतिष्ठित नागरिकांना नाहक बदनाम करणाऱ्यात व त्यांच्या चारित्र्याचे धिंडवडे काढण्याच्या कटात कोणकोण सहभागी आहेत याची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे मुळ दस्तावेज बघितल्यावर लक्षात येते आहे.

           उपलेखा परिक्षक राजेश लांडगे यांनी केलेले सदर संस्थेचे चाचणी आॅडीट हे संसयाच्या भोवऱ्यात असून संस्थेचे माजी व्यवस्थापक श्री.मारोती पेंदोर यांच्या संबधाने चाचणी आॅडीट मध्ये १७ एन्ट्रीचे प्रकार बोगस असल्याचे त्यांनी पुराव्यानिशी वरिष्ठांना कळविले आहे आणि जाईन्ड रजिस्टार नागपूर यांच्या दालनात पुराव्यानिशी प्रकरण न्यायप्रविष्ट केले आहे.याचबरोबर अरुण मेहरकुरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीय सदस्यांच्या संबधाने बऱ्याच एन्ट्री बनावट व कल्पोकल्पित असल्याचे त्यांनी जाईन्ड रजिस्टार नागपूर कोर्टात दाखल केलेल्या न्यायप्रविष्ट प्रकरणातंर्गत पुराव्यानिशी सादर केले आहे. 

         चाचणी आॅडीट करतांना एक एन्ट्री जरी चुकीची करण्यात आली आहे असे जाईन्ड रजिस्टार नागपूर यांच्या कोर्टात शिध्द झाल्यास चाचणी आॅडीट रद्द होण्याची दाट शक्यता आहे.

         मात्र,तात्कालीन वेळेत संस्थेची उलाढाल ही ५ करोड ६३ लाख ७३ हजार ९४० रुपयांची असताना,०७ करोड ६६ लाख ९० हजार ५१० रुपयांची अफरातफर माजी व्यवस्थापक श्री.मारोती पेंदोर,माजी उपाध्यक्ष अरुण मेहरकुरे व इतरांनी केली म्हणण्याचा आरोप उपलेखा परिक्षक राजेश लांडगे कोणत्या आधारावर करतात हेच कळायला मार्ग नाही.

       याचबरोबर सदर कार्यकाळात ५ करोड ६३ लाख ७३ हजार ९४० उलाढाल रुपयांपैकी,०५ करोड १० लाख ९४ हजार २३४ रुपये ९७ पैसांचे सभासद कर्ज वाटप करण्यात आले आहे.यामुळे ७ करोड ६६ लाख ९० हजार ५१० रुपयांची अफरातफर केली म्हणणे संयुक्तिक वाटत नाही किंवा उपलेखा परिक्षक राजेश लांडगे यांचे चाचणी आॅडीट सुध्दा अफरातफर रक्कम शिध्द करणार नाही असे कागदपत्रांवरून लक्षात येते आहे.

        तद्वतच गुंतवणूक १४ लाख २२ हजार १७५ रुपये आहे.हस्तरोख ७ लाख ९७ हजार ७२५ रुपये आहे.विविध मालमत्ता रक्कम २६ लाख १२ हजार ६७९ रुपये आहे.संचित नफा ५ लाख ५२ हजार ९६८ रुपये आहे.शेयर रक्कम ३७ लाख ६५ हजार ९८५ रुपये आहे.संस्था निधी १ कोटी ११ लाख ३ हजार ३८६ रुपये आहे आणि ठेवीदारांना देणे ४ कोटी ९० हजार ३३७ रुपये आहे.

        रोख रक्कम व कर्ज रक्कम ही अफरातफर मध्ये मोडत नाही.असे असताना रोख रक्कम व कर्ज रक्कम अंतर्गत श्री.अमोल मेहरकुरे व श्री.अतुल मेहरकुरे,श्री.अरुण मेहरकुरे,यांनी अफरातफर केली म्हणणे कायदेशीर दृष्ट्या पटणारे दिसत नाही.

     याचबरोबर एखाद्या संस्थेमध्ये रक्कमेची अफरातफर झाली असेल तर पुर्ण संचालक मंडळाची सविस्तर चौकशी होणे महत्त्वाचे ठरते.मात्र रक्कम अफरातफर प्रकरणात माजी उपाध्यक्ष श्री.अरुण मेहरकुरे यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना चाचणी आॅडीट अन्वये जबाबदार धरणे कोणत्या कायद्यानुसार आहे हे सुद्धा कल्पनेच्या बाहेरचे आहे.

         सदर राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पत संस्था मर्या चिमूरचा प्रशासक म्हणून सहकार खात्याचा असणे आवश्यक होते.मात्र लेखा विभागचे राजेश लांडगे यांना सदर पथ संस्थेचे प्रशासक म्हणून नियुक्ती करणे आश्चर्यकारकच आहे.तद्वतच ते स्वतः आॅडिटर असताना त्यांची सदर संस्थेचे प्रशासक म्हणून कसी काय नियुक्ती करण्यात आली?हा प्रश्न बुचकळ्यात टाकणारा आहे.

      अनुक्रमणिका मध्ये एखाद्याच्या नावापुढे फौजदारी शब्दांचा उल्लेख करणे कायद्याने मनाई आहे.असे असताना उपलेखा परिक्षक व प्रशासक राजेश लांडगे यांनी १६ व्यक्तींच्या नावापुढे फौजदारी असा शब्दांचा उल्लेख केलाच कसा?हा प्रश्न सुध्दा ज्ञानाचे वाभाडे काढतो काय?यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

       एकंदरीत चाचणी आॅडीटवरच शंका घेण्यास पुरेसा वाव असल्याने माजी व्यवस्थापक श्री.मारोती पेंदोर,माजी उपाध्यक्ष अरुण मेहरकुरे व त्यांच्या कुटुंबीयांना बदनाम करण्याचा व त्यांच्या चारित्र्याचे धिंडवडे काढण्याच्या कुटील कारस्थानाची पुढे चालून सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.