कला संस्कार युक्त शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी घडतात… — सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेडी्वार यांचे प्रतिपादन… — श्रीराम व संस्कार पब्लिक स्कूल कुरखेडा येथे ३ दिवसीय कला संस्कार वार्षिक महोत्सव उद्घाटन संपन्न…

    राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

            भारतीय संस्कृतीचे जतन करायचं असेल तर विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत कला संस्कारयुक्त शिक्षणाची जोड देऊन विद्यार्थ्यांच्या कला गुणांना चालना दिली गेली पाहिजे याकरिता आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था ही नेहमी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरिता भव्य दिव्य व्यासपीठ उपलब्ध करून देते या व्यासपीठाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व कलेच्या माध्यमातून आपली सांस्कृतिक व आर्थिक प्रगती साधावे असे प्रतिपादन दि‌ गडचिरोली नागरी सहकारी बँक गडचिरोली चे अध्यक्ष सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेडी्वार यांनी केले.

         ते कुरखेडा येथील संस्कार पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तथा श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय तथा श्रीराम वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या कला संस्कार वार्षिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष तथा विश्वहिंदू परिषद जिल्हाअध्यक्ष वामनराव फाये हे होते, तर विशेष अतिथी अतिथी म्हणून आमदार कृष्णाजी गजबे तर ई लर्निंग कक्षाचे उद्घाटक पद्मश्री डॉ. परशुराम खुणे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्था सचिव दोषहरराव फाये,संस्था उपाध्यक्ष गजानन येलतुरे, शाळा समिती सदस्य चांगदेव फाये, संस्था सहसचिव प्रा.नागेश्वर फाये ,संस्था सदस्य हुंडीराज फाये ,संस्था सदस्या विमलताई फाये, वर्षा फाये, प्राचार्य एल .डब्लू बडवाईक , एल.के.गोबाडे,प्राचार्य देवेंद्र फाये, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष टिकाराम डोंगरावर , अश्विनताई माने, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे‌,सहकार नेते वसंतराव मेश्राम,शाळा नायक अंश मेक्षाम, प्रणाली लाडे, विष्णू गायकवाड,चंदा भोयर,सुमित नैताम इत्यादी उपस्थित होते .

        पुढे बोलताना प्रकाश सावकार पोरेडी्वार यांनी म्हटले की भारतीय संस्कृती ,सण, उत्सव ची परंपरा कलेच्या माध्यमातून जोपासली जाते आणि हीच कला विद्यार्थ्यांनी कलात्मक गुणाच्या माध्यमातून सादरीकरण करून भारतीय कला जिवंत ठेवावी असे उपस्थितांना मार्गदर्शन केले .

         यावेळी आमदार कृष्णाजी गजबे यांनी विद्यार्थ्यांना विविध दाखले देत आपलं व्यक्तिमत्व या कला संस्कार महोत्सवातून सर्वांगाने बहरावे असे प्रतिपादन त्यांनी केले.यावेळी वामनराव फाये, पद्मश्री डॉ परशूराम खुणे, गजाननजी येलतुरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कारयुक्त कला आत्मसात करा अशी मार्गदर्शन केले. यावेळी पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांच्या हस्ते ई लर्निंग संच लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सिनेट सदस्य चांगदेव फाये यांनी केले तर सुत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विनोद नागपूरकर तर आभार कला संस्कार सहप्रमुख नरहरी माकडे यांनी मानले .कार्यक्रमाला कुरखेडा शहरातील प्रतिष्ठित नागरिक व अनेक पालक व बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.