आगित कापड दुकान खाक…  — तब्बल १९ लाख रुपयाची नुकसान…

दखल न्युज वृत्त

         आरमोरी तालुक्यातील मानापुर येथिल एका कापड दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे बोलले जाते. 

         जवळपास अंदाजे १९लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे समजते. मंगळवार रात्री ९:०० ते ९:३० वाजताच्या सुमारास मांगदा येथिल सीताराम सखाराम मेश्राम यांनी पुनर्ग्रस्त चवेला यांचि दुकान संपूर्ण पैसे लावून त्यांनी मानापुर येथे कापड दुकान लाविले त्यांना उदर निर्वाह साठी शेती पन नाही धन्दाच्या भरोसा वर त्यांचा उदर निर्वाह होत होता.

           त्या दूकानला अकस्मात आग लागली वेळ मंगळवार दी.०९/०१/२०२४ ला रात्रि ९:०० ते ९:३० वाजता च्या दरमान, त्यांना लोकानी फोन करुण बोलविला ते मांगादा वरुण ५ मिनटतात आपल्या मूलासोबत घटनास्थळि हजर झाले तो पर्यन्त मोटार पंपने थोडी आग कमी करुण ती आग १ तासानी आटोपन्यात आली त्यात त्यानचे जवळपास १९ ते २० लाखाचा नुकसान असल्याचे अंदाजने लक्ष्यात बोलले जात आहे. संपूर्ण हकीकत सीताराम सखाराम मेश्राम यांनी दिली.