ओबीसी-एससी-एसटी एनटी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विरोधात,महाराष्ट्र राज्य विधिमंडळात बील पास… — हे आहेत भाजपाचे व त्यांच्या मित्र पक्षांचे अच्छे दिन..

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक 

         बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे व उच्च शिक्षणाचे दरवाजे बंद करण्याची कार्यवाही भाजपा मित्रपक्षांच्या केंद्र व राज्य सरकारने सुरू केली असून त्या संबंधाने महाराष्ट्र शासनाने नुकताच जीआर काढलेला आहे.

      या जिआर ला शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी विरोध केला आहे.

      यापुढे SC,ST,OBC,NT या मागासवर्गीय समाजातील मुलांना खाजगी (private) विद्यापीठ ( university) मध्ये कोणतेही आरक्षण मिळणार नाही. 

        याशिवाय scholarship freeship हि मिळणार नाही.

         हि माहिती कोणत्याही मिडियावर येऊ नये याची दक्षता महाराष्ट्र राज्य सरकार घेत आहे.

        या संदर्भात शिक्षक आमदार कपिल पाटिल यांनी पत्रकार परिषदेत घेऊन याला विरोध केलेला आहे. 

     तसेच त्यांनी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना सांगितले की या GR ची होळी करा व सदर जीआर विरोधात जनजागृती अंतर्गत महाराष्ट्र राज्यात जोरदार विरोध करावे. 

            बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी प्राथमिक व उच्च शिक्षण योग्य प्रकारे घेऊ नये म्हणून भाजपा व त्यांचे मित्र पक्ष हे एनकेन प्रकारे प्रयत्न करीत आहेत.

       ज्या ओबीसी,एससी,एसटी एनटी,मतदारांच्या बलावर भाजपा व त्यांचे मित्र पक्ष निवडून येतात,त्यांच्याच मुलांच्या विरोधात जिआर काढून उच्च शिक्षणाचे दरवाजे बंद करतात आणि महाराष्ट्र राज्यातील ६२ हजार प्राथमिक शाळा बंद करून ग्रामीण भागातील शिक्षणाची सुविधा नाकारणारे मनुवादी विचारसरणीच्या पिल्लावळीचे बहुजन समाजातील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी वेळीच मनसुबे ओळखायला हवी.