पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत “एक गाव एक वाचनालयाचे” उदघाटन…

 

ऋषी सहारे

संपादक

 

आरमोरी-

      दिनांक १६ ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन आरमोरी अंतर्गत मौजा जोगीसाखरा येथे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी सतीश देशमुख व उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ४० विद्यार्थी बसण्याची क्षमता असलेल्या सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण व उदघाटन सोहळाचे आयोजन करण्यात आले होते.

       गडचिरोली पोलीस दल दादालोरा खिडकी अंतर्गत पोलीस स्टेशन आरमोरी व ग्रा.पं.जोगीसाखरा यांच्या संयुक्त विद्यमाने जोगीसाखरा येथे एक गाव-एक वाचनालयाचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा आमदार कृष्णा गजबे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुनानक ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष हिरालाल मोटवानी होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वडसा वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी मनोज चव्हाण, आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, आरमोरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, नामदेव किरसान, जोगीसाखरा ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच संदीप ठाकूर, युवामोर्चा चे तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, सामाजिक कार्यकर्ते नंदू नाकतोडे, पत्रकार रुपेश गजपुरे, गुरुदेव जंगल कामगार संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम, आरमोरी न.प.चे नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, भीमराव मेश्राम, भीमराव ढवळे, सुरेश कांबळे, भाकरोंडीचे सरपंच विलास उसेंडी, कुलकुली ग्रा.प.चे सरपंच विलास बावणे, ज्योती घुटके, ज्योती सोनकुसरे, सरपंच कन्नाके, सरपंच कुमरे, सरपंचा पेंदाम, सरपंचा सुलभा गेडाम, प्राचार्य खरकाटे, प्राचार्य बुल्ले , गुरुदेव कुंमरे, करिष्मा मानकर, स्वप्निल गरफडे, अश्विनी घोडाम, पोलीस पाटील राधा सेडमाके, शालीक मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

     त्याअगोदर ग्रंथ दिंडी काढुन गावात मिरवणुक काढण्यात आली. सदर कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना पोलिस दादालोरा खिडकी मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनाची माहिती देण्यात आली. 

  कार्यक्रमाचे उदघाटक आमदार गजबे म्हणाले की, नियमित वाचनाने ग्रामीण भागातील विद्यार्थीही राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करू शकतात. एक गाव- एक वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आता वाचनाची चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे वाचन केल्यास प्रशासनातही उच्च पदावर सेवारत होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी या वाचनालयाच्या माध्यमातून संधीचे सोने करून आपले भवितव्य उज्वल करावे. असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी व्यक्त केले.

      तत्पूर्वी पोलीस स्टेशन आरमोरी व ग्रा.प.जोगीसाखरा यांच्या संयुक्त विद्यमाने जोगीसाखरा गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीत व कार्यक्रमात जोगीसाखरा येथील सर्व शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी, गावातील सर्व पुरुष-महिला, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. प.सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, गृहरक्षक दलाचे जवान, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार मोठया संख्येने सहभागी झाले होते.