एक संघ लढ्यातून काँग्रेस “क्रांतीभूमीत,तिरंगा फडकविणार! – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार… — चिमुर “क्रांतीभूमीतील शहिदांना’ वाहिली श्रद्धांजली..

 

दिक्षा कऱ्हाडे 

वृत्त संपादीका 

चिमूर : – चिमूर क्रांतीचा इतिहास अजरामर – वडेट्टीवार

आज १६ ऑगस्ट चिमूर क्रांती दिनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी चिमूर येथील हुतात्मा स्मारक येथे येऊन चिमूर क्रांतीतील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.

        यावेळी बोलतांना विरोधी पक्षनेते ना.विजय वडेट्टीवार म्हणाले की सन 1942 साली देशातील चिमुरात क्रांतीची पहिली ठिणगी पेटली. यात शहीद वीर क्रांतिकारक बालाजी रायपूरकर व त्यांच्या साथीदारांनी हाती शस्त्र नसताना देखील शस्त्रधारी इंग्रज अधिकाऱ्यांशी लढा दिला. या लढ्यात अनेक तरुणांना वीरमरण आले. हा चिमुरचा क्रांतिकारी इतिहास स्वातंत्र्याच्या लढाईच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेला असून तो सदैव अजरामर राहील असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

           तसेच १६ ऑगस्ट हा देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाला कलाटणी देणारा दिवस आहे.महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जावचा नारा दिल्यानंतर संपूर्ण देशात “करो या मरो’ अशी परिस्थिती निर्माण होऊन स्वातंत्र्याच्या मोठ्या उठावास सुरुवात झाली.

             याच काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या क्रांतिकारक भजनाने प्रेरित होऊन १९४२ साली चिमुरात क्रांतीची मशाल हाती घेऊन येथील वीरांनी प्राणाची आहुती देत चिमूरला सर्वप्रथम स्वातंत्र्य मिळवून दिले. हा इतिहास देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेला.

           सलग दहा वर्षे या क्रांती भूमीचे आमदार म्हणून सेवा करण्या करिता मिळालेल्या सेवा संधीमुळे या मातीशी माझी नाळ जुळली आहे. येथील वीर शहिदांना अभिवादन करण्यासाठी मला कोणीही रोखू शकत नाही. सोबतच संपूर्ण काँग्रेस एक संघ होऊन या क्रांती भूमी तिरंगा फडकविणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी केले.ते चिमूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

          याप्रसंगी प्रामुख्याने माजी आमदार,प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आदिवासी विभाग डॉ .नामदेवराव उसेंडी, चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्र निरीक्षक, डॉ.नामदेव किरसान, महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. अविनाश वारजूकर, प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग धनराज मुंगले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा चिमूर विधानसभा समन्वयक डॉ.सतिष वारजूकर, माजी तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी तथा माजी सभापती तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर माधवबापू बिरजे,जिल्हा काँग्रेस महासचिव गजानन बुटके,राम राऊत,संजय डोंगरे,काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे प्रफुल खापर्डे,तालुका अध्यक्ष विजय गावंडे,तालुका सरचिटणीस विलास मोहिणकर,शहर अध्यक्ष अविनाश अगडे,नागेंद्र चट्टे,पप्पू शेख,राजू चौधरी,प्रमोद चौधरी,संदीप कावरे,कृष्णा तपासे,राजू लोणारे,उमेश हिंगे,कल्पना इंदुरकर,रीता अंबादे व आदी मंचावर उपस्थित होते.

        यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले कि आर.एस.एस सारख्या मनुस्मृती विचारांच्या शक्तीने देशाच्या राष्ट्रध्वजाचे महत्व कमी करण्याचा प्रकार सुरू आहे. एकिकडे देशाचे प्रधानमंत्री राष्ट्रध्वज फडकवीत असताना दुसरीकडे मात्र देशद्रोही मनोहर भिडे सारख्या कडून तिरंगा ऐवजी दुसरा ध्वज फडकवा असा समाजात तेढ निर्माण करणारा विषारी संदेश पसरविल्या जात आहे.

         देशाला जीवन समर्पित करून बलिदान देणाऱ्या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या या देशद्रोही भिडेला तुरुंगात डांबण्या ऐवजी गुरुजी म्हणून सत्ताधारी विद्यार्थी सन्मान करीत आहेत. 

          महात्मा गांधींच्या विचारांची महानता या मनुस्मृति वाद्यांना काय कळणार ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

          तर देशात पंतप्रधान मोदींनी हुकुमशाही धोरण लावण्यासाठी स्वायत संस्थांचा वापर करून पक्ष फोडाफोडींचे राजकारण सुरू केले आहे.राजकारणासाठी देवांच्या नावांचा वापर करून समाजाला जाती जातीत विभागले जात आहे.

        यामुळे देशाची एकात्मता धोक्यात आली असून २०२४ ची स्वातंत्र्याची दुसरी लढाई साठी सर्वांनी सज्ज राहून राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी करावी असेही विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार प्रतिपादन यांनी केले.