चिमूर जिल्हा करण्याचे शब्द न पाडणाऱ्या विधानसभा विरोधी पक्षनेते ना.विजय वडेट्टीवारांचे क्रांती भूमीत कार्यक्रम जोमात संपन्न!  — चिमूर जिल्हा कृती समिती कोमात!  — “वडेट्टीवारांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार” या बातमीवरून सारंग दाभेकर यांना अटक करुन गुन्हा दाखल !! — विशेष अग्रलेख सारंग धाबेकर सामाजिक कार्यकर्ते यांच्या शब्दात जशास तसा…

 

चिमूर : – अन्याय सहकर बैठे रहना यह महा पाप, दुष्कर्म है, न्यायार्थ अपने बंधु को भी दंड देना यह धर्म है। 

       सारंग दाभेकर यांची पुण्याई की आज विजय वडेट्टिवार हे विधानसभा विरोधी पक्ष नेते आहेत.शिवसेनेच्या काळामध्ये चिमूर विधान सभेची जागा सारंग दाभेकर (तत्कालीन शिवसेना तालुका प्रमुख) यांच्या वाट्याला गेली असताना वेळेवर विजय वडेट्टीवारांना चिमुरची जागा देण्यात आली.

        चिमूर क्षेत्रातील दाभेकरांचे धडाडीचे कार्य पाहता नाका पेक्षा मोती जड होऊ नये म्हणून वडेट्टीवारांनी सारंग दाभेकरांना कार्यकर्त्यांपासून डावपेचाने व कुटणीतीने दूर केले.

      गावागावात शिवसेनेच्या शाखा निर्माण करणे,जनतेच्या कोणत्याही कामाला वेळीच धावून जाऊन त्यांचे काम करताना सारंग दाभेकर यांचे सोबत असंख्य एकनिष्ठ शिवसैनिक होते. 

          विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी तात्कालीन काळात त्यांना कानमंत्र देताच काही शिवसैनिक दाभेकरांपासून दूर गेले.तेव्हापासून सारंग दाभेकर हे शिवसैनिक राहून गुरुदेव सेवामंडळाच्या माध्यमातून अखंड सामाजिक कार्य करीतच आहेत.

        परंतु “मेहनत करे मुर्गा और अंडा खाये फकीर” याप्रमाणे आयत्या बिळात नागोबा शिरून ना.विजय वडेट्टीवारांनी चिमूर मध्ये घुसखोरी केली.

         “चिमूर क्रांती जिल्हा” घोषित करणार म्हणून ना.विजय वडेट्टीवार वारंवार चिमूरकरांना खोटे आश्वासन देऊन चिमूर क्रांती भूमीची व शहिदांची चेष्टा करीत आहेत. 

          ना.विजय वडेट्टिवार हे चिमूरला येऊन स्वतःचा सत्कार करून घेतात.चिमूर जिल्हा आश्वासनाचा विसर झालेले ना.विजय वडेट्टीवारांचे क्रांती भूमीत कार्यक्रम जोरात सुरु असून चिमूर जिल्हा कृती समिती मात्र कोमात आहे असे लक्षात येते आहे.ना.विजय वडेट्टीवारांचा जराही विरोध व निषेध समितीकडून केल्या जात नाही.

         चिमूर जिल्हा करण्याचे आश्वासने दिली त्यामुळेच ना.विजय वडेट्टीवारांना पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून पाठविले.दुसऱ्यांदा निवडून दिले. ते मंत्री झाले.विरोधी पक्ष नेते झाले. पण चिमूर जिल्हा निर्माण करू शकले नाही. 

              ना.विजय वडेट्टीवार हे आमचेच मोठे बंधू आहेत.व्यक्तिगत रीत्या त्यांच्या सोबत कुठेही आमचा वाद नाही.तरी सुद्धा चिमूर क्रांती भूमीचा विकास,शहिदांचा सन्मान या ठिकाणी ना.विजय वडेट्टीवार हे आड येत असतील तर ते आमचे मोठे बंधू असले तरी त्यांचा लोकशाहीतील तत्त्वानुसार निषेध करणे हे आमचे कर्तव्यच नाही तर क्रांती धर्म सुद्धा आहे. 

          चिमूर क्षेत्रात स्वाभिमान गहाण ठेवून व लाचार होऊन अपरिपक्व नेत्यांच्या मागे तरुणाई जात असल्यामुळे ते स्वतःचे कर्तृत्व विसरले. हुल्लडबाजी व अवैध व्यवसायात तरुणांना चिमूरातील एक नेता प्रोत्साहन देत असल्याने चिमूरच्या समस्येवर व चिमूर क्रांती जिल्ह्याकडे कोणाचेही लक्ष नाही,असे माझे ठाम मत आहे.

          मात्र चिमूरच्या सर्वांगीण विकासाकरिता,चिमूर क्रांती जिल्ह्या करिता व शाहिदांच्या सन्मानाकारिता ग्रामगिता तत्वज्ञान कार्यातील गुरुदेव सेवामंडळाचे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते सारंग दाभेकर यांची जिद्द असून ज्या ना.विजय वडेट्टीवारांनी खोटे आश्वासने दिली त्यांनी चिमूर मध्ये स्वतःचा सत्कार करून यापुढे कोणतेही कार्यक्रम घेऊ नये व चिमूरकारांच्या जखमेवर मीठ चोळून चिमूरकरांना डीवचू नये असी त्यांना विनंम्रपणे सांगणे आहे.

       म्हणून 16 ऑगष्टला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी,नेत्यांनी ना.विजय वडेट्टीवारांना निषेध म्हणून काळे झेंडे दाखवण्याचे सारंग दाभेकरांनी बातमी द्वारा उघड केले होते.

        भारत राष्ट्र समितीच्या चिमूर विधानसभा समन्वयक तथा राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे जिल्हाप्रमुख सारंग दाभेकर यांनी ना.विजय वडेट्टिवारांना काळे झेंडे दाखविण्याचे आंदोलन करीत असताना पोलीस प्रशासनांनी त्यांना सकाळी दहा वाजताचे सुमारास ताब्यात घेतले व बळजबरीने आंदोलनापासून परावृत्त केले. 

         ना.विजय वडेट्टिवारांच्या लिखित तक्रारी वरून चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांनी भादवीचे कलम १०७, व ११६ नुसार गुन्हा दाखल केला.दिवसभर स्थानबद्ध करून सायंकाळी सहा वाजता वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना सोडण्यात आले. 

     . ना.विजय वडेट्टीवारांकडून अधिकाराचे दबावतंत्र वापरून स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्याच दिवशी संविधानिकरित्या अहिंसेच्या व शांततेच्या मार्गाने भावनिक रोष प्रकट करण्यावर गदा आणली गेली असल्याची पुर्णतः शंका आहे! 

           चिमूर क्रांती जिल्हा घोषित करणार असे वारंवार फोल आश्वासने देऊन जनतेला कचरा समजत त्यांची दिशाभूल करणाऱ्या विधानसभा विरोधी पक्ष नेता वडेट्टीवारांनी चिमूर येथे नौटंकी खपवून घेणे कितपत योग्य आहे याचा विचार चिमूरकरांनी करणे आवश्यक आहे.याचबरोबर चिमूरला येण्याचा नैतिक अधिकार त्यांना उरलेला नाही. 

        काळे झेंडे दाखवून निषेध करणार या बातमी अंतर्गत आगडोंब करण्याचे कारण नव्हते.ना.विजय वडेट्टीवारांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला काय?.

           स्वतंत्र भारतात कोणत्याही नागरिकाला अहिंसा व शांततेच्या मार्गाने निषेध, निदर्शने,आंदोलने,मोर्चे आणी लाक्षणिक उपोषण करण्याचा संविधानिक अधिकार असतांना सारंग दाभेकर यांचे आंदोलन बळजबरीने दाबून आवाज बंद करण्याचा प्रकार संयुक्तिक नाही. 

           चिमूरचे नेतृत्व करतांना जो आपणास सन्मान दिला त्यातच समाधान मानून आपले राजकारण करावे.आम्ही आपणांस विजू भाऊ म्हणून स्वीकारले आहे. हे संबंध कायम राहतील असे राजकीय संबंध असावे. 

          अन्यथा स्वर्गीय काळे गुरुजी ईज्या म्हणून कोणाला उद्देशून संबोधित करीत होते याची आपणांस आठवण करून द्यावीशी वाटते. 

         शेवटी चिमूर क्रांती भूमीला बाहेरून नेता वा मार्गदर्शक आयात करण्याची काही गरज नाही.आमचेवर गुन्हे तुम्ही छप्पण लावले तरी चिमूर क्रांती भूमी पुत्र कधीच डगमगणार नाही.

         माननीय विजय भाऊ वडेट्टिवार विरोधी पक्ष नेते विधान सभा हे समजदार आहेत. तेव्हा ते मिळालेल्या पदाचा योग्य वापर करून चिमूर जिल्हा घोषित केल्याशिवाय परत चिमूरला तोंड दाखविणार नाही. हा आम्हा चिमूरकरांना पूर्ण विश्वास आहे.